जालना : शाळकरी मुलाचे नग्न फोटो काढून त्याला धमकावत त्याच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सिध्दार्थ धारीवाल आणि त्याचा मित्र प्रमोद भगत यांनी निव्वळ पैशाच्या हव्यासापोटी लाखो रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले. त्याच्याकडून नव्यानेच बाजारात आलेल्या ६५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख एक लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याचे विभुते म्हणाले.सिध्दार्थ धारीवाल त्याच्या वर्तनावरून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलिस सांगत आहेत. शनिवारी रात्री पंधरा पोलिस जेंव्हा त्याच्या घरी साध्या वेशात गेले तेंव्हा सिध्दार्थ न घाबरता उडवाउडवीचे उत्तरे देऊन पोलिसांना चकवा देत होता. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. दुसरा आरोपी प्रमोद भगत सध्या फरार असून त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आली आहे. तपास अधिकारी जयसिंग परेदशी हे तपास करीत आहेत.इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाचे मोतीबागेजवळील एका स्वीमिंग पूलवर नग्न फोटो काढून ते फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात आरोपींनी तब्बल ४ लाख रूपये उकळल्याची माहिती आहे. परंतु, शाळकरी मुलाने न मोजताच आरोपींना पैसे दिल्याचे समोर येत आहे. आरोपी म्हणत आहेत की आम्हाला १ लाख २० हजार रुपयेच देण्यात आल्याची माहिती सिध्दार्थ याने पोलिसांना दिली. परंतु सिध्दार्थ याने तब्बल ६५ हजार रुपयांचा मोबाईल घेतला होता. तो जप्त करण्यात आल्याचे विभूते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पैशाच्या हव्यासापोटी केले कृत्य
By admin | Updated: March 22, 2016 01:11 IST