शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

निवडणूक आयोगाच्या निर्देशाने शहर आणि ग्रामीणमधील सुमारे १३०० शस्त्रे केली पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती : विनंती अर्जानंतर दीडशे शस्त्रे स्वसंरक्षणासाठी बाळगण्यास दिली मुभा

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली. शस्त्रे जमा करण्यासंबंधी पोलिसांकडून नोटिसा प्राप्त झाल्यानंतर शहरातील बँका, सुवर्णपेढ्यासह जीविताला धोका असलेल्या व्यक्ती अशा सुमारे १५० जणांना शस्त्रे त्यांच्याकडे ठेवण्यास मुभा दिली. जे नागरिक नोटीस मिळाल्यानंतरही शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १ हजार ३०५ जणांना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ८८ नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अथवा बंदूक आदी प्रकारची अग्निशस्त्रे खरेदी केली आहेत. याबाबतची नोंद त्यांच्या शस्त्र परवान्यावर आहे. लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात व्हावी, याकरिता प्रत्येक निवडणूक काळात परवानाधारकांकडून त्यांची शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यानुसार शहरातील १ हजार ३०५ परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी ८०० नागरिकांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन त्यांची शस्त्रे जमा केली, तर १५० नागरिक, बँका आणि सुवर्णपेढ्याचे मालक यांनी पोलीस आयुक्तांना अर्ज करून त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी शस्त्र त्यांच्याकडेच ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या अर्जावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर चर्चा होऊन संबंधिताला खरेच शस्त्राची गरज आहे का, अथवा त्यांचा राजकीय पक्षाशी काही संबंध आहे, याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यांनतर त्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आली.चौकटऔरंगाबाद ग्रामीणमधील ४९९ नागरिकांनी केली शस्त्रे जमाऔरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील ५०८ जणांना शस्त्र परवाना दिले आहे. या परवान्यावर शस्त्र खरेदी केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून शस्त्र जमा करण्यासंबंधी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी ४९९ जणांनी आज गुरुवारपर्यंत त्यांची शस्त्रे पोलीस दरबारी जमा केली.गुन्हा दाखल होऊ शकतोपोलिसांच्या नोटिसीनंतर शस्त्रे जमा न करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, ज्या लोकांनी रीतसर अर्ज केल्यानंतर समितीच्या आदेशानंतर ज्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी मिळाली, त्यांना कारवाईतून वगळले जाणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसElectionनिवडणूक