बोरी : पुणे येथून जवळच असलेल्या शिक्रापूर गावाजवळ आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात झाल्याने टेम्पोतील एक भाविक ठार तर चार जण जखमी झाले आहेत़ १९ जून रोजी ही घटना घडली़ जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथील टेम्पो क्रमांक एमएच २८-६५८० हा टेम्पो ३० भाविकांना घेऊन आळंदी येथून निघणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते़ हा टेम्पो शिक्रापूर गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ उभा असताना समोरून येणाऱ्या लक्झरीने टेम्पोला धडक दिली़ यामध्ये नामदेव लिंबाजी कुटे (६२) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ इतर जखमींमध्ये ज्ञानदेव कुटे, सदाशिव कुटे, नामदेव घोरपडे, बाबाराव महाराज यांचा समावेश आहे़ पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात लक्झरी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अपघातग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात
By admin | Updated: June 22, 2014 00:24 IST