परभणी : वऱ्हाडी घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाचे ताबा सुटल्याने बोरवंड ते सुरपिंप्री या रस्त्यावर उलटल्याने २५ वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याची घटना १० जून रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ जखमींना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ तालुक्यातील मोठा बोरवंड येथील ग्रामस्थ वडगाव येथे मंगळवारी सकाळी लग्न सोहळ्यासाठी गेले होते़ लग्न आटोपल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास टेम्पो (एमएच २०/५९९२) ने मोठा बोरवंडकडे निघाले होते़ गावाजवळ आले असता टेम्पो चालक चंद्रकांत खवले याचे गाडीवरील नियंत्रण सुटले़ यामुळे टेम्पो पलटी होऊन २५ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले़ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ जिल्हा रुग्णालयात एकाच वेळी २५ जखमी दाखल झाले़ त्यामुळे डॉक्टर व परिचारिकांची एकच धांदल उडाली़ या अपघातामध्ये १० ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत़ यापैकी नवनाथ अनंता ढेंबरे या युवकाचे एका हाताचे दोन बोटे तुटून पडली, तसेच जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात रुग्णासह नातेवाईकांनी तोबा गर्दी केली होती़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके, डॉ़ कालीदास चौधरी यांच्यासह डॉक्टरांचा ताफा तत्काळ हजर झाला़ (प्रतिनिधी)जखमींची नावे अशीगणेश लोखंडे, गोविंद लोखंडे, व्यंकटी खटींग, अनंता ग्यानोजी ढेंबरे, श्रीरंग यादव, शेख मुक्तार शेख शब्बीर, माणिक संतोष लोखंडे, विठ्ठल आश्रोबा लोखंडे, विलास नारायण लोखंडे, हरिभाऊ मुंजाजी लोखंडे, ज्ञानोबा तुकाराम लोखंडे, दत्ता रामकिशन इंगने, संभाजी भुजंग लांडे, श्रीहरी रामराव लोखंडे, ज्ञानोबा दत्तराव खुळे, नवनाथ अनंता ढेंबरे, निवृत्ती लोखंडे, शंकर बालासाहेब गिराम, आंगद किशनराव लोखंडे, ज्ञानोबा कारभारी लोखंडे, पुंजाजी अण्णासाहेब लोखंडे, कृष्णा पांडुरंग देवरे यांचा समावेश आहे़ माणुसकीचा हातवऱ्हाडी टेम्पोला अपघात झाल्याची माहिती जि़ प़ चे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, जि़ प़ सदस्य सुरेश लोंढे हे घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व स्वत: जातीने जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली़
वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात
By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST