शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांना मंजुरी, मगच तूर खरेदी

By admin | Updated: May 20, 2017 23:30 IST

बीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे

राजेश खराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसारच तुरीची खरेदी होणार आहे.जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर शिल्लक असल्याने नाफेडच्या वतीने खरेदी केंद्रांना वाढीव मुदत देण्यात आली होती. ३१ मे पर्यंत शिल्लक साठा खरेदी करावा लागणार आहे. गेल्या २८ दिवसात ६ ते ७ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून, अद्यापही शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल तूर शिल्लक आहे. जिल्ह्यातील १० खरेदी केंद्रे सध्या सुरू असून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी अधिकचा वेळ खर्ची पडत आहे. यापूर्वी खरेदी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारीच करीत होते. व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य शेतकरी खरेदी केंद्रापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे तहसीलदारांकडूनच शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला जाणार असून, कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतरच टोकन नंबरप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरेदीची माहिती भ्रमणध्वनीवरून देणे कृउबातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनिवार्य राहणार आहे.मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिकच्या तुरीची खरेदी अनियमित पद्धतीने झाली आहे. त्यामुळे उशिराचे शहाणपण शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.