शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचनचे ८ कोटी अजूनही शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:11 IST

जि.प.च्या लघुसिंचन विभागावर एक तर पदाधिकाºयांची मेहेरनजर आहे किंवा हा विभागच ठप्प झाल्याची चिन्हे आहेत. तब्बल ८ कोटी रुपये मार्च एण्डपासून शिल्लक असून त्यावर कधी चुकूनही चर्चा होताना दिसत नाही.

हिंगोली : जि.प.च्या लघुसिंचन विभागावर एक तर पदाधिकाºयांची मेहेरनजर आहे किंवा हा विभागच ठप्प झाल्याची चिन्हे आहेत. तब्बल ८ कोटी रुपये मार्च एण्डपासून शिल्लक असून त्यावर कधी चुकूनही चर्चा होताना दिसत नाही.जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग त्यांच्या संथ कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या विभागाकडून होणाºया कामांचे अहवालही बदलले जात नाहीत. प्रत्येक बैठकीत तेच अहवाल ठेवले तरीही सदस्यही निमूटपणे सहन करतात. नवीन असल्याने तर अनेकांना त्याचा अभ्यासच नाही. मात्र निधी वारंवार सांगूनही अखर्चित राहात असल्यास कामे बदलता येतात, हे बहुदा या सदस्यांना माहिती नसावे. ती बदललीच तर खर्चाचे प्रमाण मात्र शून्य टक्के राहता कामा नये, याची काळजीही त्यांना घ्यावी लागणार आहे.या विभागाला लघुपाटबंधारेच्या कामांसाठी २0१५-१६ चा शिल्लक १.३९कोटी तर २0१६-१७ मध्ये २.३१ कोटी मंजूर झाले. एकूण ३.७0 कोटी उपलब्ध असताना कामे १.४९ कोटींची झाली. २.२0 कोटी शिल्लक आहेत. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांसाठीही शिल्लक १.२३ कोटी, मंजूर १.४६ कोटी होते. मात्र कामे १.२७ कोटींची झाली. १.४१ कोटी शिल्लकच आहेत. आदिवासी उपयोजनेत लपाचे शिल्लक ४९ लाख नवीन मंजूर ५0 लाख होते. केवळ २६ लाख खर्च झाले. कोल्हापुरी बंधाºयांसाठी ओटीएसपीत शिल्लक ७७ लाख व नव्याने मंजूर ७५ लाख होते. यातही ८0 लाख खर्च अन् ७१ लाख शिल्लक आहेत. सर्वांत मोठा प्रश्न जलयुक्त शिवारचा होता. या योजनेत शिल्लकच ४.९३ कोटी होते. तर नव्याने ३.२0 कोटी मंजूर झाले होते. यापैकी ३.७८ कोटी रुपयेच खर्च झाले. ३.२0 कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे या विभागाच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.