लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना राज्य शासनाने निलंबित केले असून, त्यांच्या निलंबनाचे नुकतेच आदेश काढण्यात आले आहेत़ परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ ४८ तासापेक्षा अधिक वेळ ते कोठडीत राहिल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे़ यासंदर्भातील आदेश महसूल व वन विभागाचे अव्वर सचिव श्री़ द़ शिंदे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून, त्यांना निलंबन कालावधीत परभणी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे़
अभिमन्यू बोधवड निलंबित
By admin | Updated: June 13, 2017 23:39 IST