शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:17 IST

शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा खर्च भागविण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्या तुलनेत २५ ते ३० कोटी रुपयेही पाणीपट्टीपोटी मिळत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा खर्च भागविण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्या तुलनेत २५ ते ३० कोटी रुपयेही पाणीपट्टीपोटी मिळत नाहीत. पन्नास टक्के तोट्यात पाणीपुरवठा योजना राबवावी लागत आहे. शहरात अनधिकृत नळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, आता हा आकडा १ लाख २४ हजारांपर्यंत पोहोचला आहे. अनधिकृत नळ अधिकृत व्हावेत यासाठी मनपा प्रशासनाने पन्नासवेळा अभय योजना राबविली. या योजनेत मोजावी लागणारी रक्कम पाहूनच नागरिक मनपाला अभयदान करायला तयार नाहीत.राज्यातील सर्वच महापालिकांना अनधिकृत नळ कनेक्शनचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक अभय योजनेत नळ अधिकृत करून घेत नाहीत. इचलकरंजी महापालिकेने अलीकडेच १०० रुपये भरा आणि अनधकिृत नळ अधिकृत करा, अशी योजना राबविली. या योजनेला इचलकरंजीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. ८० टक्के नळजोडण्या एकाचवेळी अधिकृत झाल्या. औरंगाबाद महापालिकेलाही मागील काही वर्षांपासून अनधिकृत नळांचा प्रश्न भेडसावत आहे. वर्षातून तीन ते चार वेळेस नागरिकांना आपले अनधिकृत नळ अधिकृत करून घ्यावेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात येतो. मनपाकडून कधीच कारवाई होत नाही, हे नागरिकांनाही उमजले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. ४ हजार रुपये अभय योजनेचा दंड आणि चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी म्हणून ४ हजार असे एकूण ८ हजार रुपये भरण्यास नागरिक कंटाळा करीत आहेत.एकीकडे शहरात पाण्याची मागणीही बरीच वाढली आहे. १५ लाख नागरिकांची तहान भागविण्याएवढे पाणी मनपाकडे उपलब्ध नाही. सध्या शहरात तीन दिवसाआड, कुठे चार दिवसाआड पाणी देण्यात येते. अधिकृतरीत्या नळ कनेक्शन घेण्यासाठी मनपाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अक्षरश: कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावतात. त्यामुळे नागरिक अनधिकृत नळ घेऊन मोकळे होतात.मनपाच्याच रेकॉर्डनुसार सध्या अधिकृत नळ कनेक्शनची संख्या १ लाख ३४ हजार आहे. अनधिकृत नळांची संख्या १ लाख २४ हजारांपर्यंत पोहोचली आहे. अनधिकृत नळ १०० रुपये भरून मनपाने नियमित केल्यास दरवर्षी ५ कोटी रुपये पाणीपट्टीत वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा योजनेत होणारा तोटाही काही प्रमाणात कमी होईल.