लातूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम आदमी पार्टीने राज्यात संघर्ष यात्रा सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातील २८ गावांत ‘आप’ने संघर्ष यात्रेद्वारे सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी प्रबोधन सुरू केले आहे.संघर्ष यात्रा लातूर जिल्ह्यातील पेठ, सेलू, बुधोडा, खुंटेगाव, हासेगाववाडी, एरंडी, गंगापूर, जमालपूर, हिप्परसोगा, धनेगाव, शिवणी, सारोळा, हरंगुळ (खु), हरंगुळ (बु़), उमरगा, बोरी, शिवणी (खु), देवंग्रा, आष्टा, दापक्याळ, गांजुरवाडी, महाळंग्रा, भडी, खरोळा, पळशी, हनमंतवाडी, इंदरठाणा, नांदगाव या २८ गावातून मार्गक्रमन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्महत्येबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर संघर्ष यात्रेचा उपक्रम हाती घेतला आहे़ यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव जाहीर करुन सरकारने खरेदी केंद्र सुरु करावे़ १०० टक्के वीजबील माफ करावे, पीककर्ज माफ करुन खरीप हंगामासाठी पिककर्ज द्यावे, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्या यात्रेत करण्यात येत आहेत. यात्रेत संदीपान बडगीरे, राजाभाऊ पंडगे, गणेश बडगीरे, शिवाजी मोमले, रुक्मानंद मोमले, विलास चामे, प्रताप भोसले, तृप्ती बजाज, अनिरुद्ध जंगापल्ले, विवेकानंद चामले, आनंद कामगुंडा, सत्यवान नागिमे, सय्यद सैद्दुद्दीन, हरी गोटेकर, अमीत पांडे, माधवराव गुणाले, अंगद गुणाले, शेख वलीसाहेब, अनिल गुणाले, त्र्यंबक साळुंके, व्यंकट यादव, राम काळे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
‘आप’ची लातुरात संघर्ष यात्रा
By admin | Updated: January 6, 2015 01:07 IST