पंकज जयस्वाल/आशपाक पठाण/हरी मोकाशे ल्ल लातूरलातूर जिल्ह्यात विविध खात्याची तब्बल ९९५ पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांमुळे प्रशासनाच्या गाढ्याला ओढायचे कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ विविध कार्यालयाचे प्रमुख जबाबदारी प्रभारी कारभाऱ्यावर ढकलून मोकळे होत आहेत़ एकाच्या खांद्यावर चार, पाच खुर्च्यांचा भार पडल्याने कर्मचारी कधी इथे तर कधी तिथे अशा दुतर्फी प्रवासात गुंतलेले असतात़ त्यामुळे नागरिकांना जावे कोठे हे कळत नाही़ दुसरीकडे अनेक कार्यालयांचा पदभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर असल्याने कामे खोळंबली आहेत़ पदभरती नाही़ बदल्या नाहीत़ त्यामुळे विभागप्रमुखांवर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच कार्यालय हाकण्याची वेळ आली आहे़ या अवस्थेत नागरिकांनाही लालफितीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ त्याचा लातूर जिल्ह्यातील हा वृत्तांत़व्ही़एसक़ुलकर्णी ल्ल उदगीरजिल्ह्याचा दर्जा मिळवू पाहणाऱ्या उदगीरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे़ मोठ्या प्रमाणात या विभागातील पदे रिक्त असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ महसूल प्रशासनातही अशीच अवस्था आहे़ उदगीर हे सीमाभागातील महत्वाचे शहर आहे़ बाजारपेठेसोबत येथील आरोग्य सेवेचा विस्तार मोठा आहे़ तरीही प्रशासकीय अनास्थेमुळे येथील महत्वाची पदे रिक्त राहिली आहेत़ उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयातील तब्बल ५ वैैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही १ पद रिक्त आहे़ तालुका आरोग्य विभागाचेही १ पद रिक्त आहे़ तालुका आरोग्य विभागाचीही अवस्था दयनीय आहे़ येथेही तब्बल ५ वैैद्यकीय अधिकारी, ९ आरोग्यसेवक, ५ परिचर व १ लिपिकाचे पद रिक्त आहेत़ त्यामुळे नागरिकांची गैैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)४महसूल विभागातील नायब तहसीलदारांची २ पदे अद्यापि रिक्तच आहेत़ तसेच १ मंडळ अधिकारी, ५ तलाठी सज्जे रिकामेच आहेत़ नगरपरिषदेत वर्ग ४ ची १५ पदे रिक्त आहेत़ त्यामुळे उदगीरकरांना विविध कामांसाठी ताटकळावे लागते़ पंचायत समितीतील सांख्याकी विस्तार अधिकारी व उद्योग विस्तार अधिकारी अशी २ पदेरिक्त आहेत़ त्यांचा कारभार कर्मचाऱ्यांमार्फतच चालविला जात आहे़रमेश शिंदे ल्ल औसातालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आरोग्य अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकाऱ्यांचा भार अन्य अधिकाऱ्यांवर पडत आहे. औसा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेला नायब तहसीलदारच नाहीत. पंचायत समितीमध्ये सर्व जागा भरल्या असल्या तरी औसा व किल्लारी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये आहेत. या दोन्ही पदाचा कारभार सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी हेच पाहतात. औशात अव्वल कारकुनाच्या दोन तर तलाठ्याच्या तीन आणि कोतवालाच्या ३८ जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात मात्र सर्वाधिक जागा रिक्त आहेत. तालुक्यात ७ प्रमुख आरोग्य केंद्र असून, भादा ते बेलकुंड येथे प्रत्येकी दोन तर जवळगा (पो.) येथे एक अशा पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक ११, परिचर ८, कनिष्ठ सहाय्यक ४ आणि आरोग्य सहाय्यिका ४ अशी पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात विस्तार अधिकारीही महत्वाचे पद आहे. पण ४ पदे मंजूर असताना २ पदे रिक्त आहेत. एकूणच तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यासह अन्यही काही महत्वाची पदे रिक्त आहेत.राम तत्तापूरे ल्ल अहमदपूरगेल्या सहा महिन्यापासून अहमदपूर नगरपालिकेचा कारभार उदगीरच्या मुख्याधिकाऱ्यांकडून पाहिला जात आहे़ त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ अहमदपुरात नायब तहसीलदाराचे १ मंडळाधिकाऱ्याचे १, तलाठ्याचे १ अशी महसूल विभागातील पदे रिक्त आहेत़ त्याचबरोबर पशुवैैद्यकीय अधिकाऱ्याचे १, पशु पर्यवेक्षकाचे १, लिपिकाचे ३, कनिष्ठ लेखाधिकाऱ्याचे १, ट्रेसरचे १, मुख्याध्यापकांची ४, शिक्षकाचे १, ग्रामसेवकाची ५ पदे रिक्त आहेत़ त्याचबरोबर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची ३ पदे रिक्त आहेत़ नगरपरिषदेतील लिपिकाची ३ तर वाहनचालकाचे १ पद रिक्त आहे़ पोलिस उपनिरीक्षक पदाचे १, पोलिस कर्मचाऱ्यांचे १६ पदे रिक्त आहेत़ गोविंद इंगळे ल्ल निलंगाभौगोलिकदृष्ट्या निलंगा तालुका हा मोठा आहे़ त्यामुळे जिल्ह्यात या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो़ परंतु, तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक तेवढ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या नसल्याने पोलिस प्रशासनावर नेहमीच ताण पडत आहे़ निलंगा येथे नायब तहसीलदाराचे १, कारकूनाचे २, तलाठ्याचे २, विस्तार अधिकाऱ्याचे ३ पदे रिक्त आहेत़ मुख्याध्यापकांची ११ तर शिक्षकांची ७५ पदे रिक्त आहेत़ त्याचबरोबर ग्रामसेवकांची ४, पशुधन विकास अधिकाऱ्याचे १, पशुधन पर्यवेक्षकाचे ३ पदे रिक्त आहेत़ पोलिस उपनिरीक्षक पद १ रिक्त असून, पोलिस कर्मचाऱ्यांची पदे २७ रिक्त आहेत़ वास्तविक पाहता सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय यंत्रणा असणे गरजेचे आहे़ परंतु, तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे रिक्त असलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते़ तालुक्यात केंद्र प्रमुखाचे १, सुपरवायझरचे २, पशुधन पर्यवेक्षाचे ३, अनुरेखक ३, शिपाई २ अशी पदे रिक्त आहेत़ ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करित असतात़ बहुतांशी नागरिक प्रशासकीय कामाव्यतिरिक्त तालुक्याच्या ठिकाणी येणे टाळतात़ परंतु, तालुक्यात विविध पदे रिक्त असल्याने नागरिकांचे वारंवार हेलपाटे होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ एस़आऱमुळे ल्ल शिरूर अनंतपाळतालुक्याची निर्मिती होऊन चौदा वर्षांचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही प्रशासनातील संपूर्ण पदे भरण्यात आली नाहीत़ तालुक्यातील ४८ पदे रिक्त असून, त्यात २९ पदेही पोलिस कर्मचाऱ्यांची आहेत़ तालुक्यात नायब तहसीलदाराचे १, पेशकार १, वैद्यकीय अधिकारी १, परिचारक ३, मुख्याध्यापक २, शिक्षक ७, ग्रामसेवक ३, महिला व बालकल्याण विभागातील १ अशी पदे रिक्त आहेत़ त्याचबरोबर २९ पोलिस कर्मचाऱ्यांची पदे परिणामी काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे़ त्याचबरोबर नागरिकांना कामासाठी सतत ये-जा करावी लागत आहे़ रिक्त पदांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़
जिल्ह्यात ९९५ पदे रिक्त
By admin | Updated: December 21, 2014 00:09 IST