शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

९९ हजार शेतकऱ्यांना मिळाले मानसिक बळ!

By admin | Updated: December 24, 2016 01:02 IST

जालना जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे.

गजेंद्र देशमुख जालनाजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच मानसिक उपचार करण्यात येत आहेत. गत आठ महिन्यांत ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांवर मानसिक उपचार तर ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सुमपदेशन करून मानसिक बळ मिळाले आहे.जिल्ह्यात गत काही वर्षांत दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आदींना कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. इतर शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, ते मानसिकदृष्ट्या खचू नये म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प नावाने केलेल्या उपक्रमास शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णायालत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ९९ हजार ६७५ शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मानसिक आधार देण्यात आला. आवश्यक असलेली तपासणी करण्यात आलेली आहे. विषारी द्रव प्राशन केलेल्या ३८५ शेतकऱ्यांना परिपूर्ण असे मानसिक समुपदेशन करण्यात आले. त्यांना विष का प्राशन केले. त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. कोणते उपचार करण्याची गरज आहे. याची माहिती घेऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आले. थोडक्यात त्यांची मानसिक स्थिती सुदृढ करण्याचा प्रयत्न या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. एम. डी. मुळे यांनी सांगितले. अति तणावाखाली असलेल्या ३५ शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात आले. मद्यपानामुळे त्रस्त असलेल्या ४५ शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले.