शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

९९ रास्त भाव दुकाने, ८0 रॉकेल परवाने देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:50 IST

जिल्ह्यात रास्त भाव दुकाने व रॉकेल परवाने देण्याची प्र्रक्रिया सुरू झाली आहे. ११0 गावांत ९९ रास्त भाव दुकाने तर ८0 रॉकेल वितरण परवाने देण्यात येणार आहेत. मात्र यातील काही अपीलाची दुकाने वगळली जातील तर राजीनामा देणाºयांची नव्याने वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात रास्त भाव दुकाने व रॉकेल परवाने देण्याची प्र्रक्रिया सुरू झाली आहे. ११0 गावांत ९९ रास्त भाव दुकाने तर ८0 रॉकेल वितरण परवाने देण्यात येणार आहेत. मात्र यातील काही अपीलाची दुकाने वगळली जातील तर राजीनामा देणाºयांची नव्याने वाढण्याची शक्यता आहे.हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीच यासाठी प्रक्रिया करण्यात येत होती. वसमत व औंढा तालुक्यातील प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली होती. यापूर्वी निर्विवादपणे महिला बचत गटांना प्राधान्य होते. त्यानंतर शासनाने नवा आदेश काढला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे मागच्या आदेशात बदल केले होते. मात्र त्यातही नव्याने दिलेल्या निकषात एकीकडे पंचायत अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. तर या आदेशात खाली मात्र महिला व्यवस्थापनांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. त्यामुळे याबाबतची संदिग्धता कायम आहे. यावरूनही भविष्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे. यावर चर्चा सुरू असतानाच शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली सुलभ करण्याच्या अनुषंगाने १0 आॅगस्टपासून नवीन दुकाने व रॉकेल परवाने देण्यासाठी वेळापत्रकच जाहीर केले.यात वसमत तालुक्यात १५ गावांत, औंढा तालुक्यात २५ गावांत, कळमनुरी तालुक्यात ३२ गावांत, हिंगोली तालुक्यात १७ गावांत, सेनगाव तालुक्यात १६ गावांसाठी ही प्रक्रिया होणार आहे. यात काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने तर काही ठिकाणी फक्त रॉकेल परवाने देण्यात येणार आहेत.सर्व तहसीलकडून यासाठी माहिती गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात अपील असलेली दुकाने वगळण्यासाठीही सांगण्यात आले आहे. तर काही ठिकाणी राजीनामा दिल्याने दुकाने बंद झाली असल्यास ती नव्याने या यादीत घेतली जाणार आहेत. यावेळी प्रचंड झुंबड उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.