शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

९४ ग्रा.पं. चे लेखापरीक्षणच नाही

By admin | Updated: June 16, 2017 23:23 IST

हिंगोली : शासनाने लेखा परीक्षण झाल्याशिवाय ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी देवू नये, असे निर्देश दिल्यानंतरही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्यापही झाले नसल्याचे समोर येत आहे.

हिंगोली : शासनाने लेखा परीक्षण झाल्याशिवाय ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी देवू नये, असे निर्देश दिल्यानंतरही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्यापही झाले नसल्याचे समोर येत आहे. या ग्रामपंचायतींचे दस्तावेज सापडत नसल्याचे समोर येत आहे.ग्रामपंचायतींच्या कारभारात सुधारणा व्हावी, यासाठी शासनाने लेखापरीक्षण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जवळपास अडीचशे ग्रामपंचायतींचे रखडलेले लेखापरीक्षण पूर्ण करून घेण्यासाठी ग्रा. पं. नी प्रयत्न केले. त्यातून बाहेर पडलेल्या ग्रामपंचायती वगळल्या तरीही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्याप बाकीच आहे. त्यातही तुरळक ग्रामपंचायतींचेच एका वर्षाचे लेखापरीक्षण राहिले. अनेक ग्रा.पं.नी ५ ते ६ वर्षांचे लेखापरीक्षण केलेले नाही. लेखा परीक्षक मात्र यामुळे वेळापत्रक ठरवून हैराण होतात. याशिवाय स्थानिक निधी लेखा कार्यालयात परीक्षकांची अपुरी संख्या अन् रिक्त पदे यामुळे २00७-0८ ते २0१४-१५ पर्यंतचेच लेखा परीक्षण झालेले आहे. मागील दोन वर्षांच्या लेखा परीक्षणासाठी लवकरच नवे वेळापत्रक जारी होणार आहे. ५६५ ग्रामपंचायतींची संख्या असल्याने ५ ते ७ परीक्षकांसाठी ही वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे. लेखा परीक्षण राहिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी, मेथा, नांदखेडा, जोडपिंप्री, सावळी खु., सावरखेडा, आसोंदा, पांगरा त.लाख, हिवरखेडा, सुरवाडी, दरेगाव, गढाळा, कोंडशी, जडगाव, लक्ष्मण नाईक तांडा, लोहरा बु., बेरुळा, लोहरा खु., निशाना, येडूत, वसमत तालुक्यातील गुंडा, आडगाव, कळंबा, दाभाडी, हयातनगर, कोनाथा, सेलू, रांजोना, कानोसा, एकुरखा, पुयनी खु., दारेफळ, करंजाळा, लोळेश्वर, डोणवाडा, रायवाडी, कुपटी, पुयनी बु., पारवा, वीरेगाव, हट्टा, रोडगा, सेनगाव तालुक्यातील खडकी, धनगरवाडी, खुडज, पळशी, सवना, सिनगी नागा, जांभरुण रोडगे, बोरखेडी जी., धानोरा ज., देवूळगाव ज., आजेगाव, माझोड, रिधोरा, कारेगाव, आडोळ, पार्डी पो., पिंपरी लिंग, जमदया, सुलदली, सालेगावे, वाघजाळी, चोंढी खु., हिवरखेडा, वरूड चक्रपान, खैरखेडा, बाभूळगाव, हिंगोली तालुक्यातील बासंबा, बोडखी, राहुली खु., कनका, बळसोंड, अंधारवाडी, कलगाव, हिंगणी, कानडखेडा खु., कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ, तोंडापूर, दाती, घोडा, जरोडा, हारवाडी, बोथी, सांडस, वरूड, बाभळी, कांडली, रेडगाव, पाळोदी, काळ्याची वाडी, भोसी, जवळा पां, येलकी या गावांचा समावेश आहे.