मंगळवारी दिवसभरात पिशोर, नाचणवेल, करंजखेडा, वासडी, चिंचोली लिंबाजी या ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ५८७ देशी दारूच्या बाटल्या व दोन दुचाकी असा सुमारे ८४ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सपोनि हरीशकुमार बोराडे, सहायक फौजदार माधव जरारे, श्रावण तायडे, जमादार सोनाजी तुपे, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, संदीप कनकुटे, वसंत पाटील, शिवदास बोराडे, उद्दलसिंग नागलोत, विलास सोनवणे, राहुल राजपूत यांचा समावेश आहे.
छायाचित्र - कारवाईत जप्त करण्यात आलेली दारू व अटक केलेल्या आरोपींसह कारवाईतील पोलीस पथक.
300321\patel mubeen abdul gafoor_img-20210330-wa0062_1.jpg
पिशोर हद्दीत ८५ हजारांची देशी दारु जप्त, पाच जणांना अटक