शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च

By admin | Updated: February 24, 2016 23:57 IST

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७ हजार २९२ कामे सिंचनाशी संबंधित करण्यात आली आहेत़ परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (नरेगा) मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत़ यासंदर्भात नरेगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १४ हजार ८४१ कामे करण्यात आली आहेत़ त्यामध्ये मजुरांवर ५१ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा तर मशीनद्वारे करण्यात आलेल्या कामांवर ३२ कोटी ९ लाख १ हजार रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे़ यामध्ये पाणीपुरवठ्याची १ हजार ९०४ कामे करण्यात आली आहेत़ त्यासाठी मजुरांवर ५ कोटी २४ लाख ९३ हजार तर मशीनद्वारे करण्यात आलेल्या कामांवर १ कोटी ११ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७६६ कामे जिंतूर तालुक्यात करण्यात आली असून, या तालुक्यात २ कोटी ८३ लाख रुपये या कामांवर खर्च करण्यात आले आहेत़ सर्वात कमी कामे मानवत तालुक्यात करण्यात आली असून, या तालुक्यात ४८ कामांवर ८ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात ५८७ रस्त्यांच्या कामांवर १० कोटी ३० लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात आले असून, मशीनद्वारे करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवर ५ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २६८ कामे करण्यात आली असून, या कामांवर एकूण ५ कोटी ४७ लाख ११ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात रस्त्याचे सर्वात कमी म्हणजे ६ कामे करण्यात आली आहेत़ याशिवाय पिण्याच्या पाण्याचे बळकटीकरण करण्याचे जिल्ह्यात १९ कामे करण्यात आली असून, या कामांवर १ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे केवळ परभणी तालुक्यातच हा खर्च करण्यात आला आहे़ अन्य आठही तालुक्यांत या कामांवर खर्च करण्यात आलेला नाही़ दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १८८५ कामांवर एकूण २ कोटी १३ लाख ४१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ त्यामध्येही जिंतूर तालुका आघाडीवरच आहे़ या अंतर्गत सर्वात कमी म्हणजे ५ कामे सोनपेठ तालुक्यात करण्यात आली आहेत़ परंतु, या कामांवरचा खर्च प्रशासनाने वेबसाईटवर दिलेला नाही़ जमिनीचा विकास करण्याचे जिल्ह्यात ४७ कामे करण्यात आली असून, त्यावर ४२ लाख २ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात इतर ३१ कामे करण्यात आली असून, त्यावरचाही खर्च वेबसाईटवर देण्यात आलेला नाही़ (जिल्हा प्रतिनिधी)