शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी !

By admin | Updated: August 2, 2014 01:38 IST

उस्मानाबाद : अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे.

उस्मानाबाद : अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करूनही बियाण्याची उगवण झालेली नाही. अशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडील ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी उरकल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ५३०.२०० हेक्टरवर पेरणी झाली आहे, तुळजापूर तालुक्यात ५६ हजार ९०० हेक्टर, उमरग्यात ६६ हजार ७००, लोहारा २८ हजार ६००, कळंब ७ हजार ३००, वाशी ३२ हजार २००, भूम २७ हजार ५०० हेक्टर तर परंडा तालुक्यात १० हजार ५०० असे एकुण जिल्ह्यात ३ लाख ४८ हजार ३०० हेक्टर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मंडळनिहाय पाऊस१०० मिमी पेक्षा कमी : जागजी मंडळाअंतर्गत ९७.०१ मि.मि पाऊस पडला आहे. तसेच सावरगांव ८१, परंडा ६८, वालवड ९९, ईटकूर ५८, मुळज ८० तर पारगांव ८७ मिमी.१०० ते १२५ मिमी पर्यंत : पाडोळी ११२.४ , तेर १२५, ईटकळ १०७, जळकोट १२३, आसू १०४, जवळा १०१, मोहा १०७, डाळिंब सर्कलमध्ये १२५ मिमी.१२५ ते १५० मिमी पर्यंत : ढोकी १३३, सलगरा १३३, नळदुर्ग १४३, अंबी १२६, मुरुम १३४, लोहारा १३२.०८ , माकणी १२८ मिमी.१५० ते १७५ मिमी पर्यंत : बेंबळी १५६, मंगरुळ १५७, केशेगाव १५६, अनाळा १५६, सोनारी १६२, माणकेश्वर १५२, ईट १५५, कळंब १७०, गोविंदपूर व नारंगवाडी या दोन मंडळात १७२ मिमी.उमरगा १९० व जेवळी १९६ या दोन मंडळात १७५ ते २०० मिमी पाऊस पडला.२२५ ते २५० पर्यंत : उस्मानाबाद २१४ तर येरमाळा २०९ येथे २०० ते २२५ मिमि पाऊस , भूम २४६ तर वाशी २२९ मिमी. तसेच तुळजापूर २५२, तेरखेडा २९० तर शिराढोण २६१ मिमी इतका पाऊस पडला.उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन या पिकांची पेरणी केली असून याची ४११ टक्के पेरणी झाली आहे. भात २८ टक्के, ज्वारी २९ टक्के, बाजरी ४३ टक्के, मका ९३ टक्के, तूर ५७ टक्के, भूईमूग २६ टक्के, मुग ५७ टक्के, तिळ ३१ टक्के, सुर्यफूल १३ टक्के, कारळे ३१ टक्के, कापूस ४०४ टक्के , ऊस ४३ असे एकुण ८९ टक्के विविध पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.सव्वालाख मेट्रीक टन चाराखरीप हंगाम २०१४ मधुन जिल्ह्यासाठी ४ लाख २५ हजार ८२८ मेट्रीक टन चारा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातून ६० हजार ६५७ मे टन, तुळजापूर ५९ हजार ५३९, उमरगा ७६ हजार ९१, लोहारा ४४ हजार ३२, भुम ६५ हजार ११३, परंडा ४२ हजार ५०७ मे टन, कळंब ४२ हजार ७८२ तर वाशी तालुक्यातून ३५ हजार ११० असे एकुण ४ लाख २५ हजार ८२८ मेट्रीक टन चारा उपलब्ध होऊ शकतो असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.