शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी ७६ कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरात तीन वर्षांपूर्वी अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली होती. शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ...

औरंगाबाद : शहरात तीन वर्षांपूर्वी अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली होती. शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १४८ कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर केला. मागील अडीच वर्षांत पालिकेला ७२ कोटी म्हणजे ४८ टक्केच निधी प्राप्‍त झाला आहे. उर्वरित ७६ कोटींच्या निधीची मनपाला प्रतीक्षा आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये नारेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन केले आणि शहराची कचराकोंडी झाली. मिटमिटा येथे कचऱ्यावरून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर राज्य सरकारने पालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी १४८ कोटींचा निधी मंजूर केला. मागील अडीच वर्षांत चिकलठाणा येथील १५० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प वर्षभरापूर्वीच सुरू झाला. पडेगाव, कांचनवाडी, हर्सूल या प्रकल्पांची कामे या ना त्या कारणाने रेंगाळतच राहिली. आता पडेगावचा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प आणि कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले. शनिवारी पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या तीनही प्रकल्पांचे लोकार्पण झाले. याप्रसंगी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माहिती देताना मंजूर निधीतून ७२ कोटी रुपये राज्य सरकारकडून प्राप्‍त झाल्याचे नमूद केले. तथापि, हर्सूल प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच नारेगाव येथील २० लाख मेट्रिक टन कचऱ्याचा डोंगरदेखील पालिकेला नष्ट करावयाचा आहे. उर्वरित कामांसाठी पालिकेला निधीची प्रतीक्षा आहे.