शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७५० कोटींच्या उलाढालीची ‘दिवाळी’

By admin | Updated: November 14, 2015 00:51 IST

राजकुमार जोंधळे , लातूर दुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली.

राजकुमार जोंधळे , लातूरदुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे वाहन, कपडे आणि सोन्या-चांदीच्या बाजारात समाधानकारक उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सर्वाधिक उलाढाल ही दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बाजारात झाली असून, तब्बल ५०० कोटींची उलाढाल दसरा ते दिवाळी दरम्यान झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.यंदाच्या दिवाळीत मंदीबरोबर दुष्काळाचे सावट होते. मात्र ही मंदी आणि दुष्काळाची मरगळ झटकत काही प्रमाणात बाजारपेठेत दिवाळीच्या तोंडावर गर्दी झाली. ही गर्दी ऐन दिवाळीच्या सणात मोठ्या प्रमाणावर वाढली. परिणामी, बाजारपेठेत वाहन बाजार, सराफा, कापड, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलसारख्या महत्त्वपूर्ण बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. शहरी भागात वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ग्रामीण भागात मात्र यंदा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात गरजेनुसार ग्राहकांनी दिवाळीच्या नरकचतुर्दशी आणि पाडव्यादिवशी दागिण्यांची खरेदी केली. या बाजारातील उलाढालीचा आकडा लातूर शहर आणि जिल्ह्यात ६० कोटींवर पोहोचला आहे. भुसार लाईनमध्ये यंदाच्या दिवाळीने १० कोटींची उलाढाल झाली. तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १२ कोटींची उलाढाल झाल्याचे किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. विशेषत: कपड्यांचा व्यापार ऐन दिवाळीत तेजीत असल्याचे द्वारकादास शामकुमार वस्त्र दालनाचे तुकाराम पाटील यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कापड बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. मात्र ऐन दिवाळीत ग्राहकांचा टक्का वाढला आणि ही उलाढाल शहरासह जिल्ह्यात १० कोटींवर गेली. यात रेडिमेड आणि फॅन्सी साड्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. इलेक्ट्रॉनिक बाजारात कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आदींची खरेदी मध्यमवर्गीय कुटुंबाकडून झाली. या बाजारात लातूर शहरासह जिल्हाभरात जवळपास ३५ लाख रुपयांच्या घरात उलाढाल झाल्याची माहिती संजोग कॉम्प्युटरचे मालक शामकुमार छगनलाल शिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लातूर शहरातील जिल्हाभरात किमान पाचशे मोबाईल विक्रेत्यांची दुकाने आहेत. या मोबाईल विक्रेत्यांच्या दुकानात २५ विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन विक्रीसाठी आहेत. मोबाईल अत्यावश्यक गरजेची आणि संवादाची वस्तू असल्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्ट फोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. दिवाळीच्या सणासुदीत मोबाईल बाजार तेजीत असल्याचे दिसून आले. या मोबाईल बाजारात लातूर शहरासह जिल्ह्यात २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती नंदी मोबाईलचे संचालक रविशंकर जळकोटे यांनी दिली.