शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षण न करणा-या ७ हजार संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:56 IST

संस्थेचे नियमित लेखापरीक्षण न करणा-या जिल्ह्यातील ६,९८६ संस्थांची नोंदणी धर्मादाय सहआयुक्तांनी रद्द केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संस्थेचे नियमित लेखापरीक्षण न करणा-या जिल्ह्यातील ६,९८६ संस्थांची नोंदणी धर्मादाय सहआयुक्तांनी रद्द केली आहे. तसेच या संस्थाचालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले असून, संस्थांची मिळकत व संपत्तीही जप्त करण्यात येणार असल्याची माहिती धर्मदाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी दिली.याबाबत पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथील धर्मादाय सहआयुक्त भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात नोंदणीकृत अशा ३० हजार सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशीय संस्था आहेत. मात्र, यातील अनेक संस्था आपले नियमित लेखापरीक्षण करीत नाहीत. याविषयी राज्य आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही जिल्ह्यातील लेखापरीक्षण न करण-या संस्थेचा शोध घेतला. त्यात १९६४ पासून ते २००४ पर्यंतच्या नोंदणी झालेल्या ६९६८ संस्था अशा आढळल्या आहेत की त्यांनी कधीच लेखापरीक्षण केले नाही. या संस्थाचालकांना नोटिसी पाठविण्यात आल्या असून, २३ आॅक्टोबर ते १९ डिसेंबरपर्यंत या संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी लेखापरीक्षण केलेले पुरावे दाखविले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची मिळकत व संपत्तीही जप्त करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपायुक्त व्ही. आर. सोनुने, सहायक धर्मादाय आयुक्त एस. व्ही. एच. कादरी, सहायक धर्मादाय आयुक्त एस. के. मुळे, ए. एस. बडगुजर व जनसंपर्क अधिकारी प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.