शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

६२ बालकांची हृदय शस्त्रक्रिया

By admin | Updated: June 28, 2017 00:03 IST

हिंगोली : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील २ लाख १८ हजार ४१४ बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील २ लाख १८ हजार ४१४ बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत असून ६२ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी ५८ तर अंगणवाडीतील ४ बालकांचा सामावेश आहे.निरोगी व सुदृढ पिढी घडविण्यासाठी जिल्हाभरात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी तसेच शालेय मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांची मोफत तपासणी व उपचार केले जात आहेत. आरोग्य तपासणी करून बालकांत आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करण्यात आले. ६ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर मोफत उपचार या कार्यक्रमातून केले जातात. सदर कार्यक्रमात २०१६-१७ मध्ये जिल्ह्याला ६ ते १८ वयोगटातील २ लाख ३० हजार ९०० मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ लाख १८ हजार ४१४ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये ५८ जणांना हृदयाचा विकार असल्याचे आढळून आले होते. त्यांची राजीवगांधी जीवनदायी योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. तर २३८ बालकांची इतर शस्त्रक्रिया या कार्यक्रमातून करण्यात आली. तसेच अंगणवाडीतील ० ते ३ वयोगटातील १ लाख ६६ हजार ३५ चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ बालकांची हृदय शस्त्रक्रया तर ३४ बालकांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातर्फे देण्यात आली .