शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जिल्ह्यातील ६२ वाळूपट्टे वाऱ्यावर !

By admin | Updated: January 29, 2015 01:14 IST

संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यातील सर्वच ६२ वाळूपट्टे सध्या अवैध उपशाचे अड्डे बनले आहेत. दररोज या पट्टयांवरून रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे

संजय कुलकर्णी ,जालनाजिल्ह्यातील सर्वच ६२ वाळूपट्टे सध्या अवैध उपशाचे अड्डे बनले आहेत. दररोज या पट्टयांवरून रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. काही ठिकाणी कारवाई केली जात असली तरी ती तात्पुरतीच असते. अधिकाऱ्यांच्या अशा दूर्लक्षामुळे हे वाळूपट्टे वाऱ्यावरच आहेत.भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, बदनापूर आणि जालना या आठही तालुक्यांमध्ये सर्रासपणे वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी जालन्यात या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांचे कान टोचले. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील वाळू पट्ट्यांचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. सप्टेंबर २०१४ला आधीचे लिलाव संपुष्टात आले. नंतर उपशाला बंदी असल्याने लिलाव झाले नाहीत. मात्र, वाळू उपसा काही थांबला नाही. भोकरदन, घनसावंगी, अंबड आणि बदनापूर तालुक्यात काही पट्टयांवर तर भर दिवसा हा अवैध उपसा सुरू आहे. त्याचप्रमाणे मंठा, परतूर, जालना व जाफराबाद या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाळूचे अवैध उत्खनन होत आहे. आरटीओ, महामार्ग पोलीस, संबंधित ठाण्याचे पोलीस, महसूल प्रशासन या यंत्रणेने संयुक्त मोहीम फार कमी वेळा राबविलेली आहे. त्यामुळे या माफियांचे फावते आहे. वाळू माफियांकडून पाळतट्रॅक्टर ट्रॉली, टिप्पर, ट्रक या वाहनांद्वारे होते. बहुतांश ठिकाणी सायंकाळी सातनंतर वाळू माफियांचा अवैध उपशाचा हा गोरख धंदा सुरू होतो. या माफियांची माणसे त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या पाळतीवरच असतात. अधिकाऱ्यांचे ‘लोकेशन’ त्यांना माहिती असते. एखाद्या तालुक्यात कठोर, कार्यतत्पर अधिकारी असेल, आणि त्यांनी छाप्यासाठी सापळा रचला असेल तर त्याची माहिती अगोदरच माफियांना कळते. हा प्रकार सर्वच ठिकाणी होतो, असेही नाही. मात्र जेथे सापळा यशस्वी होतो, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात, मारहाण केली जाते, हे भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही घटनांवरून स्पष्ट झालेले आहे. जालन्याचे तहसीलदार रेवननाथ लबडे म्हणाले की, आॅक्टोबर २०१४ पासून आजपर्यंत वाळू उपशाला शासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु या काळात जालना तालुक्यात अवैध उपशा करणारी ५७ वाहने आमच्या पथकांनी पकडली व त्यांच्याकडून १० लाखांचा दंड वसूल केला. ४भोकरदनचे तहसीलदार अविशकुमार सोनवणे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यात एकाही वाळूूपट्टयाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे महसुलात घट झाली. परंतु या दरम्यान ज्या ठिकाणी वाळूचा अवैध उपसा उघडकीस आला तेथे एकूण आठ लाखांचा वाळूसाठा जप्त केला. काही जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.तालुक्यात पूर्णा, गिरजा, केळणा पात्रात वालसा, केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, नळणी, तडेगाव, हसनाबाद, बोरगाव तारू, बोरगाव खडक, कोदोली, बामखेडा, गव्हाण संगमेश्वरमधून होतेय वाळू वाहतूक. तालुक्यात पूर्णा, धामणा आणि केळणा या नदीपात्रांतील टाकळी, सावंगी, जाफराबाद, जवखेडा ठेंग, बोरगाव, पिंपळखुटा या पट्टयांमधून होतोय अवैध वाळू उपसा. अंबड तालुक्यात बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोरी, गंधारी, डोमलगाव, शहागड, वाळकेश्वर, कुरण, हिंगणगाव, गोंदी, हसनापूर या पट्टयांवरून सायंकाळनंतर अवैध उपसा केला जात आहे. घनसावंगी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी दिवसाच चोरटी वाहतूक सुरू आहे. भादली, कोठी, शिवनगाव, राजाटाकळी, मंगरूळ, गुंज, बानेगाव, भोगगाव, रामसगाव या पट्टयांवर वाळूचा अवैध उपसा होत आहे.