शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

६० लाख लिटर दारू

By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST

बीड : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

बीड : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दारुचा महापूर वाहणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस रात्रभर गस्तीवर राहणार आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.खास ‘थर्टी फर्स्ट’साठी बार, हॉटेल पहाटेपर्यंत उघडी राहणार असून शौकिनांना यामुळे दिलासा मिळाला आहे. नववर्षाच्या स्वागताला मित्रांची मैफल रंगणार आहे. यानिमित्ताने अनेकांनी हॉटेल, बारमध्ये जंगी मेजवान्यांचे आयोजन केले आहे. दरम्यान, उत्सवावर विरजण पडणाऱ्या अप्रिय घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवस आधीपासूनच ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या कारवाया सुरु झाल्या आहेत. गुरुवारी ४० तर शुक्रवारी पन्नासहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता फटाके फोडून जल्लोष होणार आहे. यावेळी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी पोलीस पुरेपूर काळजी घेणार आहेत. ध्वनिक्षेपकांचा आवाज मोजण्यासाठी ४० यंत्रे उपलब्ध आहेत. शांतता प्रवण भागात ५० व इतर ठिकाणी ६० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनीचे क्षेपण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांच्या तपासणीसाठी दोन ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र आहेत. पोलीस कर्मचारी रात्रभर गस्तीवर राहणार असून आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.गतवर्षी डिसेंबर महिन्यात ६० लाख लिटर दारुची विक्री झाली होती. यंदाही तेवढेच मद्य विक्रीसाठी आल्याचे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)