गंगाराम आढाव, जालनाडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेच्या अनुदान वितरणास महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने ३० जुलैरोजी एका शासन निर्णयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्यातील २७६ मदरशांना ९ कोटी २१ लाख ६१ हजार ८५९ रूपयाचा निधी मिळणार आहे. त्यात जालना जिल्ह्यातील १८ मदरशांना ६० लाख ६० हजार ७०० रूपयाचा निधी मिळणार आहे.मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या न्या. सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाची आर्थिक व शैक्षणिक स्थिती हलाखीची असल्याची बाब निदर्शनास आली होती. या समाजातील गरीब मुले मदरशात राहून शिक्षण घेत असल्याने महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ११ आॅक्टोबर २०१३ रोजी शासननिर्णयानुसार राज्यात डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरू केली. या योजनेनुसार मदरशामध्ये पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र हे विषय शिकविण्यासाठी मदरशांना पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी मदरशांना अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड समिती स्थापन करून मदरसा चालवित असलेल्या संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात छाननीअंती मदरशाची यादी तयार करून निधीची मागणी करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे या चार विभागातील २७४ मदरशांना ९ कोटी २१ लाख ६१ हजार ८५९ रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो संबंधित मदरशांना वितरण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.जामियातुल मोमीनात उम्मे सलमा मदरसा चंदनझिरा ३ लाख १० हजार, अरबिया रियाजुल उलुम मदरसा अन्वा (ता. भोकरदन) ४ लाख ५० हजार, रहेबर मदरसा स्कूल भिस्तीपुरा जालना ३ लाख १० हजार, अबुजर उर्दू अरबीमदरसा, माहोरा (ता. जाफराबाद) ३ लाख ३० हजार, अजीजीया उर्दू अरबी मदरसा, सावंगी (ता. भोकरदन) ३ लाख ३० हजार, मोहम्मदिया मदरसा भोईपुरा जुना जालना २ लाख ६० हजार, रबीब अरबी मदरसा लतिफपूर (ता. भोकरदन)३ लाख ७० हजार, मोहम्मदिया अरबी मदरसा हसनाबाद (ता. भोकरदन)३ लाख ७० हजार, मदरसा हजरत उमर रजि जालना ४ लाख, फैज उल उलूम राणीउंचेगाव (घनसावंगी) ३ लाख ९० हजार, अल्खैर अरबी मदरसा घुगर्डे हदगाव (ता. अंबड) ३ लाख १० हजार, मदरसा हजरत उमर रजि वालसावंगी (ता.भोकरदन) ३ लाख ६० हजार, अल्खैर अरबी मदरसा जालना ३ लाख १० हजार, मदरसा अरबिया सर सय्यद अहेमद खान मंठा १ लाख ९० हजार ७००, रजवीया लतिफीया मिस्बाहुल उलूम खरपुडी (ता जालना)३ लाख ९० हजार, दारूल गुलशने कादरी अनवारे रजा तट्टूपुरा जालना ३ लाख ३० हजार, मोहम्मदीया उर्दू अरबी मदरसा जाफराबाद ३ लाख १० हजार , मदरसा फातेमातुजवारा शास्त्री मोहल्ला जूना जालना ३ लाख ४० हजार , याप्रमाणे मदशांना अनुदान वितरित होणार आहे. \शिक्षकांना मानधनही मंजूर झालेल्या या निधीतून मदरशांसाठी पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी २ लाख रूपये, ग्रंथालयासाठी ५० हजार रूपये व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान मंजूर झाले आहे.जिल्ह्यातील १८ मदरशांना ६० लाख ६० हजार ७०० रूपयांचा निधी मिळणार आहे. मराठवाड्यात१६८ मदरशांना पाच कोटीजिल्हामदरशांची संख्यावितरित अनुदानऔरंगाबाद६५२२५७००००नांदेड३६११७१६७९७जालना१८६०६०७००लातूर१५४८५८५००बीड१९६४०००००हिंगोली१५४८८००००एकूण१६८५६४८५९९७
मदरशांना ६० लाखांचा निधी
By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST