शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील चिलवडी येथील ३३/११ के .व्ही. उपकेंद्राचे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता स. दा. कसबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धारूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील वाढलेल्या सिंचन क्षमतेमुळे दिवसेंदिस विजेची मागणी वाढत आहे. सदरील मागणी लक्षात घेता काही नवीन सबस्टेशन उभारणी करणे आणि जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविण्याबाबत शेतकऱ्यांतून वारंवार मागणी होत होती. त्यानुषंगाने उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असता त्यांनी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी या कामासाठी मंजूर केला आहे. या निधीतून चिलवडी, तडवळा क., ढोराळा, डिकसळ, पिंपळगाव लि., ढगपिंपरी, चव्हाणवाडी, तलमोड, माडज व आष्टाकासार या दहा ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अंंबेजवळगे, वडगाव सि., पाडोळी ना., दहिफळ, वालवड, जेवळी, लोहारा, उमरगा चौरस्ता, सलगरा, सावरगाव, बोरगाव व येवती येथील सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात येणार आहे. ही कामे झाल्यानंतर संबंधित सबस्टेशनवरील शेतकरी ग्राहकांना उच्च दाबाने आणि सुरळीत विजपुरवठा होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळेच चिलवडी येथे नवीन सबस्टेशन मंजूर झाले. ते येत्या काही दिवसांत कार्यान्वीतही होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना सुरळीत आणि उच्च दाबाने विजपुरवठा होईल, चिलवडीचे उपसरपंच शाम जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, कृ.उ. बा. संचालक पोपट पाटील, माजी उपनगरध्यक्ष अमित शिंदे, सतीश दंडनाईक, सरपंच हरिश्चंद्र दिंडोरे, उपसरपंच शाम जाधव, सुर्डीचे उपसरपंच हनुमंत झांबरे, नारायण करवर, आप्पासाहेब ढोकळे, आण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)