शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन ५७ हजारांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:36 IST

लातूर : अधिक सोने देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांना अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट देत त्यांच्याकडील ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली़

लातूर : अधिक सोने देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांना अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट देत त्यांच्याकडील ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली़ याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लातूर शहरातील शोभा हरिदास पवार (रा़अयोध्या नगर, कव्हा रोड)यांच्यासह अन्य एका महिलेला अज्ञात दोघांनी अधिक सोने देण्याचे आमिष दाखविले़ दोघांकडून मिळणाऱ्या दुप्पट सोन्याच्या आमिषाला शोभा पवार आणि अन्य एक महिला बळी पडल्या़ ठरल्याप्रमाणे गुरूवारी दुपारी हनुमान चौक ते गंजगोलाई रस्त्याकडेला ते अज्ञात दोघे थांबले होते़ दरम्यान, या दोघी महिलांनी त्यांच्या जवळ जात आपल्या गळ्यातील व जवळील दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले़ त्या बदल्यात त्या चोरट्यांनी या दोन महिलांना सोन्याचे बिस्कीट दिले़ त्यानंतर हे दोघे काही वेळात पसार झाले़ आपल्याला दुप्पट सोने मिळाले आहे, या भावनेने शोभा पवार व त्यांच्या सोबत आलेल्या एका महिलेने या सोन्याच्या बिस्कीटा विषयी सराफाकडे जावून अधिक चौकशी केली़ त्यानंतर अज्ञात दोघा चोरट्यांनी दिलेले हे सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांना अचानक घाम फुटला आणि यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले़ याप्रकरणी तातडीने गांधी चौक पोलीस ठाणे गाठत शोभा हरिदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा विरोधात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़