जालना : येथील नगर पालिकेत विविध विभाग मिळून ५५ पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या कामाकाजासोबतच पालिकेतील कामांचाही खेळखंडोबा झाला आहे. विशेष म्हणजे अस्थापनेवरील सवंर्ग कर्मचाऱ्यांचीही ३६ पदे रिक्त आहेत. पालिकेत महत्वाचे अशी चार अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. जालना पालिका अ दर्जाासोबतच आयएसओ मानांकित आहे. पालिकेचा कारभार पारदर्शी तसेच गतीमान होण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची गरज असते. प्रत्यक्षात पालिकेचा कारभार विविध अडचणी तसेच समस्यांच्या गर्तेत अडकलेला आहे. कोणते कर्मचारी काय काम करतात, हेही काही वेळा लक्षात येत नाही. वर्ग तीन व चारचे कर्मचारी अधिकाऱ्यांची कामे करत आहेत. त्यांच्याकडे पदभारही आहे. मनुष्यबळ नसल्याने तसे करावे लागत असल्याची पुस्ती पालिका प्रशासन जोडते. प्रत्यक्षात पालिकेत सर्वच विभागात अनागोंदी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेतील चार अभियंते व दोन अधिकाऱ्यांची पदस्थापनेमुळे बदली झाली. त्यांच्या जागेवर कोणीच आले नाही. त्यामुळे बांधकाम विभागात अभियंताच नाही. शहर अभियंत्यांवर सर्व भार आहे. ३० मार्च २०१६ अखेर वरिष्ठ लिपीक दोन, लिपीक टंकलेखक १२, लघू लेखक २, लिडिंग फायरमन २, वाहनचालक कम आॅपरेटर ५, उद्यान पर्यवेक्षक १, ग्रंथपाल १, आरोग्य अधिकारी १, आरोग्य अधिकारी १, आरोग्य सहाय्यक १, स्वच्छता निरीक्षक ७, प्रयोगशाळा सहाय्यक १, हवालदार,चालक ३, फायनमन ७, मुकादम ९ मिळून ५५ पदे रिक्त आहेत. जालना आस्थापनेवरील संवर्ग कर्मचारी पदांपैकी कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, मिळकत पर्यवेक्षक, विधी व कामगार पर्यवेक्षक, खरेदी आणि भांडार पर्यवेक्षक, समाजकल्याण माहिती आणि जनसंपर्क पर्यवेक्षक ५ पदे रिक्त आहेत.नगर अभियंता १, नगर अभियंता विद्युत १, नगर अभियंता संगणक १, नगर पर्यवेक्षक स्थापत्य १, पर्यवेक्षक संगणक १, स्वच्छता पर्यवेक्षक १ ही पदे रिक्त आहेत. लेखापरिक्षक १, लेखापाल १, सहाय्यक लेखापरिक्षक १, अग्निशमन अधिकारी १, सहाय्यक अग्निशमन अधिकारी ३, नगर रचनाकार १, उपनगरचाकार १, रचना सहाय्यक ३ पदे रिक्त आहेत. काहींकडे नगरपंचायतीचा भारपालिकेतील काही कर्मचाऱ्यांकडे नव्याने स्थापन झालेलया नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा भार देण्यात आला आहे. तर काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहेत. यामुळे पालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र पालिकेत पहावयास मिळते.
पालिकेत तब्बल ५५ पदे रिक्त..!
By admin | Updated: March 31, 2016 00:24 IST