शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

पोलिसांसाठी आणखी ५३२ घरे

By admin | Updated: June 23, 2016 01:31 IST

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि शहर पोलिसांसाठी आणखी ५३२ घरांचा प्रकल्प बांधण्यात येत आहे.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि शहर पोलिसांसाठी आणखी ५३२ घरांचा प्रकल्प बांधण्यात येत आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. शिवाय सिटीचौक पोलीस ठाण्याची ४० वर्षे जुनी इमारत पाडून तेथे मॉडेल पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्र्रलंबित आहेत. अर्ध्याहून अधिक पोलिसांना घरेच नाहीत. जुन्या पोलीस कॉलनीतील घरे राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे मोडकळीस आलेली जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे पोलिसांचे क्वॉर्टर्स उभारण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या अनुषंगाने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) के. एल. बिष्णोई हे आज बुधवारी औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात अमितेशकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीला यापूर्वीच शासनाने मंजुरी दिलेली आहे. आयुक्तालयाच्या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. शिवाय पोलीस आयुक्तालयाच्या मागील जुनी वसाहत पाडून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येत आहेत.शहर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ५३२ घरे बांधण्यात येत आहेत. या घरांसाठी अतिरिक्त १४० कोेटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. पुढील महिन्यात या घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पोलीस वसाहतीच्या कामाचा शुभारंभ होईल. सिडको एन-१० पोलीस कॉलनीमधील शंभरहून अधिक जुन्या घरांना भूतबंगल्याचे स्वरूप आले आहे. या घरांची नियमित दुरुस्ती न झाल्याने घरांची ही अवस्था झाल्याचे मानले जाते. पोलीस आयुक्तालयाला दोन वर्षात नवीन अद्ययावत तीन मजली इमारत प्राप्त होणार आहे. दोन महिन्यांत आयुक्तालयाच्या इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आयुक्तालयाची इमारत सुंदर आणि आकर्षक असणार आहे. तळमजला आणि वर तीन मजले, असे स्वरूप या इमारतीचे असेल. आयुक्तालयाच्या मागील रिकाम्या जागेवर ही इमारत उभारली जात आहे.