औरंगाबाद : पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील पाणीटंचाईने अधिकच भीषण स्वरूप धारण केले आहे. विभागातील बाराशेपेक्षा जास्त गावे सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. यापैकी सहाशे गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित सहाशे गावांना जवळपासच्या भागातील विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.मराठवाड्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. सुरुवातीला औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांतील काही गावांनाच टंचाईचे चटके बसत होते. मात्र, हळूहळू टंचाईने भीषण स्वरूप धारण केले. मे महिन्यात विभागातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये ही टंचाई जाणवू लागली. आता जून महिन्यात तर ही टंचाई आणखीच वाढली आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ९५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. चालू आठवड्यात यामध्ये आणखी अडीचशे गावांची भर पडली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्याही मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात ४६ ने वाढली आहे. सद्य:स्थितीत विभागातील ६०९ गावांना ५०३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २२२ टँकर सुरू आहेत, तर सर्वांत कमी १ टँकर हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. परभणी जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. औरंगाबाद१४७२२२जालना२० २२परभणी००००हिंगोली०१०१नांदेड२५0८बीड३३८१६८लातूर०७ ०७उस्मानाबाद ७१६५एकूण६०९ ५०३८०० गावांमध्ये ९९५ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठाअनेक टँचाईग्रस्त गावांत प्रशासनाने टँकर सुरू करण्याऐवजी तेथे जवळपासच्या भागात विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून दिले आहे. विभागात सध्या ८०० गावांमध्ये ९९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी २३१ गावांमधील २४९ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३६८ विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २६६, जालना जिल्ह्यात २६, हिंगोली जिल्ह्यात १२, नांदेड जिल्ह्यात ४७, लातूर जिल्ह्यात ८० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या विहिरींमधून गावकऱ्यांना त्यांच्याच परिसरात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील आठवड्यात विभागात ८२७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. चालू आठवड्यात त्यात १६८ विहिरींची भर पडली आहे.
५०३ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST