शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापोटी जिल्ह्याला मिळणार ५०० कोटी रुपये...

By admin | Updated: January 20, 2017 00:19 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी रबी २०१५ व खरीप २०१६ पीकविम्यापासून वंचित होते.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी रबी २०१५ व खरीप २०१६ पीकविम्यापासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते. या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केल्याने जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे सुमारे पाचशे कोटी रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.शेतकऱ्यांना रबी हंगामाचा (२०१५) पीकविमा दिवाळीपूर्वी मिळावा यासाठी राज्य शासनाने आकस्मिक निधीमध्ये राज्याच्या वाट्याच्या रकमेची आगाऊ तरतूद करून ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री, कृषी मंत्री, प्रधान सचिव व अप्पर मुख्य सचिव कृषी-वित्त विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, शासनाने तशी कार्यवाही केली नव्हती. अखेर हिवाळी अधिवेशनामधील पुरवणी मागण्यांमध्ये यासाठी तरतूद करण्यात आली. परंतु, ३० दिवस लोटूनही प्रत्यक्षात याबाबतचा शासन निर्णय निघालेला नव्हता. त्यामुळे १२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यानंतर कुठे राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना रबी हंगाम २०१५-१६ अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसानभरपाईसाठी ४०७.९४ कोटी भारतीय कृषी विमा कंपनीस मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय १८ रोजी निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम-२०१६ मध्ये जिल्हाभरातील ३ लाख ८ हजार ६०३ शेतकऱ्यांनी पिके विमा संरक्षित केली होती. विमा हप्त्यापोटी २८.५८ लाख रूपये भरले होते. पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिली. परिणामी उत्पादकतेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट आली. त्यामुळे नवीन पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची २५ टक्के रक्कम आगाऊ मिळणे अपेक्षित होते. परंतु, ही रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळावी म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने पाठपुरवा केला असता राज्य शासनाने खरीप हंगाम-२०१६ साठी पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम ८५३.८० कोटी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस अदा करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी पीक विम्यापोटीचे शासनाने १२६१.७४ कोटीचा हिस्सा विमा कंपनीकडे अदा करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे रबी २०१५ व खरीप-२०१६ पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ५०० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उर्वरित सहाशे कोटी रूपये तातडीने द्यावेत, अशी मागणी आ. पाटील यांनी केली आहे.