शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

साताऱ्यातील ५०० इमारती रडारवर

By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST

औरंगाबाद : चटई निर्देशांकाचा (एफएसआय) भंग केलेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या हद्दीतील आणखी ५०० इमारती अतिक्रमण हटाव पथकाच्या रडारवर आहेत.

औरंगाबाद : चटई निर्देशांकाचा (एफएसआय) भंग केलेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या हद्दीतील आणखी ५०० इमारती अतिक्रमण हटाव पथकाच्या रडारवर आहेत. नवीन बांधकाम सुरू असलेल्या ३५० इमारतींना नोटिसा देऊन अतिक्रमण विभागाने ४५ इमारतींवर कारवाई केली आहे, तर काही सर्वसामान्यांच्या फ्लॅट व इमारतींनाही नोटिसा बजावल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.साताऱ्यातील इमारत पाडण्याच्या कारवाईमुळे सध्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांत आतापर्यंत ३५ इमारतींना नोटिसा दिल्या असून, इतरांना नोटिसा देण्याचे काम सुरू असल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरीत ५०० इमारती नियमबाह्य असल्याचे निदर्शनात आले असून, त्या नगर परिषदेच्या रडारवर आहेत. सातारा परिसरात ५0 टक्क्यांहून अधिक बांधकामे ग्रामपंचायतीच्या मंजुरीने निर्माण झाली आहेत. २१ लाख रुपये बंदोबस्त खर्चपाडापाडीत सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी यांनी बंदोबस्त दिला होता. सातारा पोलिसांनी जवळपास ११ दिवस दिलेल्या बंदोबस्ताचे २१ लाख ५८ हजार ७०३ रुपये खर्चाची नोटीस आयुक्तालयामार्फत सातारा-देवळाई नगर परिषदेला गेली असल्याचे सांगण्यात आले. बंदोबस्तासाठी १ लाख रुपये आगाऊ दिले होते. उर्वरित २० लाख ५८ हजार ७०३ रुपये आयुक्तालयाला येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.घरांचे खिंडार करणार का?औरंगाबाद : सातारा, देवळाई नगर परिषदेच्या हद्दीतील अनधिकृत घरे पाडण्याची नोटीस देण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातारावासीयांमध्ये भीतीचे वातावरण असून साताऱ्याचे खिंडार करणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सातारा आणि देवळाई नगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत इमारतींवर मागील ३० दिवसांपासून कारवाई चालू आहे. चटई निर्देशांकाचे उल्लंघन केलेल्या इमारतमालकांना आधी नोटिसा बजावून इमारतींच्या अनधिकृत मजल्यांवरील काही भाग पाडण्याची कारवाई मुख्याधिकारी अशोक कायंदे आणि प्रशासक विजय राऊत यांनी सुरू केली आहे. बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई झाली तोपर्यंत अनेक नागरिक शांत होते. मात्र, आता नागरिकांचीही घरे पाडण्याच्या नोटिसा बजाविण्यास सुरुवात झाल्याने घबराट आहे. औरंगाबाद शहरातील सिडकोमध्ये एक एफएसआय असताना अनेक मजली इमारती उभ्या राहिल्या, पालिका हद्दीत अनेक अनधिकृत वसाहती अधिकृत होऊन त्यांना नागरी सुविधाही मिळाल्या. महापालिकेने आतापर्यंत रस्त्याच्या आड येणाऱ्या तसेच वाहतुकीला किंवा सार्वजनिक हिताला बाधक ठरणाऱ्या इमारतींवर कारवाई केली आहे. इतकेच काय मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीच्या संदर्भातही मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय झाला. नागरिकांच्या मते हाच दृष्टिकोन सातारा, देवळाई नगर परिषदेने ठेवायला हवा.