शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५० लाखांचा उडाला बार

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

सोमनाथ खताळ , बीड दिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने

सोमनाथ खताळ , बीडदिवाळी म्हटलं की, उत्साह, रोषणाई, फटाक्यांचा ठो ठो आवाज. सर्वत्र आनंदाचे वातावरण.. मात्र यावर्षीची दिवाळीत फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाने दगा दिल्याने आणि खरीपाची पीके हातची गेल्याने शेतकऱ्यांपासून ते व्यापारापर्यंत याचा परिणाम दिसून आला. उसनवारीवरच शेतकऱ्यांनी आपली दिवाळी साजरी केली.े यावर्षी सुमारे ५० लाख रूपयांच्या फटाक्यांचा बार उडाला.यावर्षीची दिवाळी झाली मात्र त्यावर पावसाने दगा दिल्याचा परीणाम साफ दिसून येत होता. दरवर्षी फटाक्यांमध्ये कोटींची उलाढाल होत असते मात्र यावर्षी हा बार केवळ ५० लाखाच्या आसपासच उरकला. मागील दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत.लहानांपासून ते थोरापर्यंतचे, वाड्या-वस्त्यांपासून ते शहरापर्यंतचे सर्वचजण दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. फटाके फोडल्यानंतर घरी बनविलेल्या गोडधोड जेवणावर ताव मारला जातो. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही यावर्षीची गोड पदार्थ तिखट लागत होता.नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीकही हातून गेले. प्रत्येकवर्षी दिवाळीचा सण हा कापसाच्या पहिल्या वेचणीवर साजरा केला जात होता. मात्र पावसाअभावी कपाशीचे पिकही गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले. याचा परीणाम दिवाळीच्या सणावर साफ दिसून आला. कपड्यापासून ते फटाक्यापर्यंतची उलाढाल यावर्षी केवळ लाखातच आटोपली.दरम्यान, कपडे, किराणा, सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीमध्ये देखील याचा परिणाम दिसून आला़ निवडणुकांमुळे दिवाळीतील व्यवहार आधीच लांबणीवर पडले होते़ त्यानंतर मात्र व्यापारपेठ गजबजली होती़