---
औरंगाबाद : एसबीओए शाळेच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याच्या मागणीसाठी सोमवारी पालकांनी ठिय्या दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांना पालकांनी ५० टक्के शुल्क माफीचे निवेदन दिले. त्यावर व्यवस्थापनाकडे पालकांची मागणी पोहचवू असे शाळेकडून पालकांना सांगण्यात आले.
कोरोना लाॅकडाऊनमुळे पालकांना आर्थिक अडचणीत निर्माण झाल्या आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे शाळेने पालकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. शाळेकडून मागितले जात असलेले संपूर्ण शुल्क भरणे पालकांना शक्य नसल्याने ५० टक्के शुल्क माफी करावी अशी मागणी पालकांनी केली. यावेळी पालक कृती समितीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
विद्यार्थ्यांच्या शुल्कात १२०० रुपये कमी केले आहेत. पालकांना टप्प्याने शुल्क जमा करण्याची सवलत दिली आहे. पालकांची आणखी फी कमी करण्याची मागणी आहे. ती व्यवस्थापनापर्यंत पोहचवू. ३६०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. शुल्काअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही याची काळजी घेत आहोत.
-सुरेखा माने, मुख्याध्यापिका, एसबीओए शाळा