शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला ५० कोटींचे कर्ज

By admin | Updated: May 20, 2014 01:45 IST

भारत दाढेल, नांदेड महापालिकेला नगरोत्थानचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी हडको कंपनी ५० कोटींचे कर्ज देण्यास तयार झाली आहे़

भारत दाढेल,  नांदेड महापालिकेला नगरोत्थानचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी हडको कंपनी ५० कोटींचे कर्ज देण्यास तयार झाली आहे़ मात्र त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या मालमत्ता गहाण ठेवावी लागणार आहे़ त्यामुळे कोणती मालमत्ता गहाण ठेवावी, या विचारात मनपा प्रशासन गुंतले आहे़ महापालिका नगरोत्थान व जेएनएनयुआरएमचा उर्वरित निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे खाजगी संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत होती़ मात्र कर्ज देण्यासाठी कोणतीही संस्था पुढे येत नसल्याने मनपाला कर्ज देता कोणी कर्ज, असे म्हणण्याची वेळ आली होती़ हापालिकेला विविध विकास कामांचा निधी प्राप्त करताना स्वत:चा सहभाग भरावा लागत आहे़ अगोदरच तिजोरीत खणखणाट असलेल्या महापालिकेला आपला वाटा भरण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही़ त्यासाठी काही संस्थांकडे प्रस्तावही सादर केले़ परंतु या संस्थांनी महापालिकेला कर्ज देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता़ नांदेड शहराचा जेएनएनयुआरएम योजनेत समावेश झाल्यानंतर शहरात विविध विकास करण्यात आले़ यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, मल:निसारण आदी कामे करण्यात आले़ योजनेतंर्गत ७३९ कोटींचा निधी मंजूर झाला होता़ यामध्ये केंद्र शासनाचा ८० टक्के, राज्य शासनाचा १० व महापालिकेचा १० टक्के सहभाग आहे़ या योजनेतंर्गत ६९३ कोटी मिळाले असून उर्वरित निधी मिळण्यासाठी योजनेच्या नियमांची पुर्तता करणे आवश्यक आहे़ शहरातील पूर्ण झालेल्या विकास कामांची देखभाल करण्यासाठी मनपाला स्वत:चे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे़ तसेच मालमत्ता कराची वसुली करणे शंभर टक्के बंधनकारक आहे़ दरम्यान, मागील दोन वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही़ त्यामुळे विकास निधीचा पुढील हप्ता मिळण्यास विलंब झाला़ त्यामुळे अनेक कामे रखडले़ दुसरीकडे आयएलअ‍ॅन्डएफएस या सल्लागार संस्थेकडून ५० कोटींचे कर्ज घेण्याची तयारीही केली़ परंतु त्याठिकाणीही यश आले नाही़ कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेतलेल्या महापालिकेने आपल्या मालकीच्या प्रमुख मालमत्ता यापूर्वीच गहाण ठेवल्या आहेत़ आजपर्यंत घेतलेल्या १०५ कोटींच्या कर्जापोटी महापालिकेला दर महिन्याला मुद्दल व व्याज असे मिळून २ कोटी रूपये द्यावे लागतात़ शहरातील मुख्य मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर १२० कोटींचे कर्ज पीएमडीओ कडून मंजूर झाले़ त्यानुसार १०० कोटी प्राप्त झाले़ उर्वरित २० कोटी टप्याने मिळणार आहेत़ दरम्यान, नगरोत्थानचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटींचा प्रस्ताव हडकोकडे सादर केला होता़ हडकोने ५० कोटींचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे़