शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवसांत साडेचौदाशे कोटी बँकांच्या तिजोरीत !

By admin | Updated: January 8, 2017 23:47 IST

उस्मानाबाद :जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये मिळून थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेचौदाशे कोटी रूपये किंमतीच्या नोटा जमा केल्या.

उस्मानाबाद : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटा बँकेत जमा करण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधतील जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये मिळून थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेचौदाशे कोटी रूपये किंमतीच्या नोटा जमा केल्या. नोटबंदीनंतर पंचेवीस ते तीस दिवसानंतर नोटा जमा करण्याचा ‘फ्लो’ मंदावल्याचे दिसून येते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पाचशे तसेच हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. केंद्र शासनाच्या वतीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली. हा निर्णय घेताना जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, या निर्णयानंतर नोटा जमा करण्यासाठी तसेच बदलून घेण्यासाठी जिल्हाभरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. बँकांमध्ये येणाऱ्या नोटांचा फ्लो साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधिक होता. त्यानंतर हा फ्लो कमी-कमी होत गेला. दरम्यान, ८ नाव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबतच एच.डी. एफ.सी. बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदी सोळा बँकांच्या विविध शाखामध्ये मिळून मिळून १४५७ कोटी ८८ लाख रूपये जमा झाले आहेत. यामध्ये सुमारे ६७ लाखापेक्षा अधिक हजार रूपयांच्या नोटा जामा झाल्या आहेत. या नोटांचे सुमारे ६७५ कोटी रूपयांपेक्षा अधिक मुल्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे पाचशे रूपयांच्या सुमारे १ कोटी ५६ लाखापेक्षा अधिक नोटा ग्राहकांनी बँकांमध्ये जमा केल्या आहेत. या नोटांचे मुल्य ७८२ कोटीपेक्षा अधिक आहे. अक्षरश: लोकांनी रांगा लावून बँकेत पैसे जमा केले. परंतु, याच ग्राहकांना आता गरजेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याचे चित्र सर्वच पहावयास मिळत आहे. विशेषत: ग्रामीण भागात अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांसह तळागळातील घटकाला बसताना दिसत आहे. बाजारपेठेत शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहेत. व्यापाऱ्याला शेतीमाल देवूनही दहा ते पंधरा दिवस पैसे खात्यावर पडत नाहीत. एकूणच बँकामध्ये साडेचौदाशे कोटीवर जुन्या नोटा जमा झाल्या. परंतु, दुसरीकडे गरजेनुसार पैसे मिळत नाहीत.