औरंगाबाद : लोकमत-राजुरी स्टील दसरा दिवाळी शॉपिंग उत्सव-२०१४ ची बंपर सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात चित्रा कोहीरकर या ५ तोळे सोन्याच्या भाग्यशाली विजेत्या ठरल्या आहेत. द्वितीय बक्षीस दुचाकीचे विजेते अरविंद पाटील, तर तृतीय बक्षीस लॅपटॉपचे मानकरी अमित गायकवाड ठरले आहेत. दसरा-दिवाळी या सणानिमित्त ग्राहकांचा खरेदीचा उत्साह द्विगुणित होण्यासाठी, मागील १२ वर्षांपासून शहरातील व्यापाऱ्यांच्या सोबतीने लोकमत दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव साजरा करीत आहे. यंदा या उत्सवात सहभागी झालेल्या व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करून शहरवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यंदा दसरा उत्सव ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर व दिवाळी उत्सव १५ ते १९ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात आला. या काळात दररोज सोडतीद्वारे ७० पेक्षा अधिक भाग्यवान ठरलेल्या ग्राहकांचे नाव दुसऱ्या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. या काळात ५८० पेक्षा अधिक बक्षिसे वाटप करण्यातआली. लोकमतचा हा दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव मागील १२ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या उत्सवातील कूपन जमा करण्यापासून ते बक्षीस काढण्याची पारदर्शकप्रणाली हीच या उत्सवाची जमेची बाजू ठरत आहे. ग्राहक व व्यापारी यांच्यातील नाते यामुळे आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे, असे मत डॉ. राजगोपाल तोतला यांनी व्यक्त केले. प्रमोद डेरे म्हणाले की, दसरा-दिवाळी सणात ग्राहक आवर्जून लोकमतच्या उपक्रमाची प्रतीक्षा करीत असतात. यामुळे आम्ही दरवर्षी या उत्सवाचे सहप्रायोजकपद स्वीकारतअसतो. अशोक जैन यांनी सांगितले की, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही लोकमतसोबत मागील २५ वर्षांपासून जोडले गेलो आहोत. या उत्सवाच्या व अन्य उपक्रमांच्या लोकप्रियतेचा फायदा आमच्या बँ्रडला झाला आहे.‘आम्ही भागीरथनगरमध्ये राहतो. शुक्रवारी सायंकाळी मला लोकमतमधून फोन आला की, मॅडम आपले अभिनंदन. लोकमतच्या दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सवामधील पहिले बंपर बक्षीस ५ तोळे सोन्याच्या आपण भाग्यवान विजेत्या ठरल्या आहात. हे ऐकून मला पहिले कोणी तरी आपली थट्टा करीत आहे असेच वाटले; पण नंतर खात्री पटली. मला आयुष्यात कधीच कोणतेही बक्षीस लागले नाही आणि पहिल्यांदाच तेही ५ तोळे सोने बक्षीस मिळणार यामुळे माझा आनंद गगनात मावेना. ही आनंदाची बातमी मी सर्वप्रथम माझ्या सासूबार्इंना सांगितली. लोकमतमुळे आजचा दिवस भाग्याचा ठरला, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकमत, राजुरी स्टील व पारस द रेमंड शॉपीला शतश: धन्यवाद देते.’-चित्रा कोहीरकर(बंपर बक्षिसाच्या भाग्यवान विजेत्या)मान्यवरांची उपस्थितीशुक्रवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी लोकमत भवन येथे बंपर सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजगोपाल तोतला यांच्या हस्ते प्रथम बक्षिसे काढण्यात आली. यावेळी राजुरी स्टीलचे निखिल अग्रवाल, दरख किराणाचे लक्ष्मीकांत दरख, लॅपटॉप बाजारचे प्रमोद डेरे, विनोद डेरे, रवी मसालेचे अशोक जैन, कांचन स्टीलचे निखिल अग्रवाल तसेच सुभाष बाहेती, राजेश मालशेटवार, तन्मय सहाणी, लवेश हस्सानी, अशोक अग्रवाल, गोपाल अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, मनप्रीत सलुजा, अविनाश गुप्ता, रोशनी मोदी, श्रीकांत सराफ, गिरीश न्याती, राहुल जोशी, श्याम दाड, संजय धीवर, मनोज पाटणी, सचिन करमानी यांची विशेष उपस्थिती होती. बंपर सोडतीमधील भाग्यवान विजेतेलोकमत-राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव बंपर सोडतीत ५ तोळे सोन्याच्या भाग्यवान विजेत्या चित्रा कोहीरकर (कूपन क्रमांक १०६५६२) ठरल्या. त्यांनी अदालत रोडवरील पारस रेमंड शॉपीमधून कपडे खरेदी केले होते.दुचाकीचे द्वितीय विजेते अरविंद पाटील (कूपन क्रमांक ३५८५८१) यांनी जुना मोंढा येथील संजयकुमार अँड कंपनी या दुकानातून किराणा माल खरेदी केला होता. लॅपटॉपचे तृतीय बक्षिसाचे मानकरी अमित गायकवाड (कूपन क्रमांक १०८५४६) यांनी हायकॉन इलेक्ट्रॉनिक्स येथून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली होती. बंपर बक्षीस ५ तोळे सोन्याचे प्रायोजक राजुरी स्टील, द्वितीय बक्षीस दुचाकीचे प्रायोजक रवी मसाले, तर तृतीय बक्षीस लॅपटॉपचे प्रायोजक लॅपटॉप बाजार यांच्यातर्फे ही बक्षिसे देण्यात आली आहेत.
५ तोळे सोन्याच्या चित्रा कोहीरकर विजेत्या
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST