शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

जिल्हा परिषद शाळांचे ५ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

जिल्हा परिषद शाळांचे ५ विद्यार्थी जागतिक विक्रमात सहभागी --- अवकाशात सोडले १०० उपग्रह : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल ...

जिल्हा परिषद शाळांचे ५ विद्यार्थी

जागतिक विक्रमात सहभागी

---

अवकाशात सोडले १०० उपग्रह : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउण्डेशनचा उपक्रम

---

औरंगाबाद : अवकाशात १०० उपग्रह एकाच वेळी हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपण करून विश्वविक्रम, आशिया विक्रम, भारतीय विक्रम, असिष्ट वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला गेला. यात जिल्ह्यातून साई सुनील मनपुरे (शाळा बजाजगेट, वळदगाव), श्रद्धा चुंगडे (शाळा पेंडापूर), गौरव मोरे (शाळा पुरी), रोहित बागुल आणि ऋषिकेश सोनवणे (शाळा भादली, ता. वैजापूर) हे पाच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. ते सर्व जिल्हा परिषद शाळेतील आहेत.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज २०२१चा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउण्डेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपतर्फे राबवलेल्या प्रकल्पांमध्ये रविवारी देशातील एक हजार विद्यार्थ्यांच्या हस्ते १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवून हा जागतिक विक्रम नोंदवला आहे. हे प्रक्षेपण रामेश्वरम येथून करण्यात आले. विजयकुमार लिंबोरे, श्रीरंग औचरमल या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना रामेश्वरम येथे जाऊन उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे हे उपग्रह भारतातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या बनवून प्रक्षेपित केल्याने हे सर्व विक्रम प्रस्थापित झालेले आहे. राज्यातून ६५ विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष हजर राहून हा विश्वविक्रमात सहभाग नोंदविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी विद्यार्थी व शिक्षकाचे कौतुक केले.