शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘संत एकनाथ’च्या फडात ४१ उमेदवार

By admin | Updated: June 21, 2016 01:09 IST

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५८ उमेदवारांनी

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले असून आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार राहिले आहेत. मंगळवारी (दि.२१) उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीराम सोन्ने यांनी दिली.उमेदवारी अर्ज परत घेण्याची सोमवारी अंतिम मुदत असल्याने आमदार संदीपान भुमरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, राजेंद्र पा. शिसोदे, नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे हे या निवडणुकीत एकत्र आले असून ते अडचणीच्या ठरू शकणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात होते, तर दुसऱ्या गटाकडून भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पा. शिसोदे, माजी आमदार संजय वाघचौरे, सचिन घायाळ, अप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी राजकीय हालचाली सुरू होत्या. रिंगणात राहिलेल्या उमेदवाराच्या संख्येवरून निवडणूक दोन पँनलमध्ये लढली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यांनी घेतली माघारउमेदवारी अर्ज परत घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आमदार भुमरे यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज परत घेतला असला तरी ते पाचोड गटातून निवणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, विद्यमान संचालक संभाजी सव्वासे, नंदलाल काळे, प्रा. परसराम मोरे, सुरेश दुबाले, अण्णासाहेब औटे, विठ्ठल शेळके, रतनलाल गारदे, द्वारकाबाई दोरके आदी प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेतली. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी यांना सहा. निबंधक श्रीराम सोन्ने, कासार, अण्णा मुळे, काळे यांनी सहकार्य केले.