शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैठणच्या कारखान्यात ४० लाखांची चोरी

By admin | Updated: September 4, 2014 00:53 IST

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातून ४० लक्ष रुपयांचे मशिनरी पार्ट चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे.

पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातून ४० लक्ष रुपयांचे मशिनरी पार्ट चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कारखाना प्रशासनाने कुठलीही फिर्याद अद्याप पोलिसांत दिलेली नाही. मात्र, आ. संजय वाघचौरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आ. वाघचौरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कारखान्यातून पंप असेम्ब्ली, घन मेटल, बॉयलर ट्यूब, हाप बेरिंग (११) व पितळी पार्ट चोरीस गेलेले आहेत. याची अंदाजे किंमत ४० लक्ष असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा कारखान्यात चोरी झाली होती. विशेष म्हणजे कारखान्यात सुरक्षारक्षक तैनात आहे, असे असतानाही चोरी कशी होते. कारखान्यातून या वस्तूंची चोरी करण्यासाठी ट्रकचा वापर करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. आ. वाघचौरे यांनी केलेल्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी संचालक भीमराव डोके यांना विचारणा केली असता कारखान्यातून काही वस्तू चोरीस गेल्याची कबुली त्यांनी दिली. चेअरमन मुंबई येथे गेलेले असून ते आल्यावर अहवाल घेऊन फिर्याद देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.कारखाना सुरू करण्यासाठी आपण पाहिजे ती मदत करण्यास तयार आहोत; परंतु चेअरमन वेळकाढू धोरण राबवीत आहेत. कारखाना चालू करण्यासाठी चेअरमन संदीपान भुमरे यांनी बैठक घ्यावी. मी बैठकीस उपस्थित राहून मदत करीन, असा दावा आ. संजय वाघचौरे यांनी केला आहे.