शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कंपनीला ४० कोटींचे दान

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेने समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला सुजल निर्मल योजनेतून टाकण्यात आलेल्या ४० कोटींचे ‘पार्टी गिफ्ट’ दिले आहे. कंपनी आणि मनपाच्या ७९२ कोटींच्या करारात या रकमेचा कुठेही समावेश नाही. कंपनीला ही जलवाहिनी फुकटात मिळाली आहे. सप्टेंबर २०११ मध्ये झालेल्या कन्सेशन अ‍ॅग्रीमेंटपूर्वी ४० कोटी रुपयांतून ती योजना मनपाला मंजूर झाली होती. तरीही ती रक्कम पालिकेने करारातून वजा केलेली नाही. १ सप्टेंबरपासून कंपनी शहराला पाणीपुरवठा करीत आहे. राज्य शासनाने २००९ मध्ये सुजल निर्मल या योजनेंतर्गत ४० कोटी रुपयांचा विशेष निधी पाणीपुरवठ्यासाठी दिला होता़ त्यातून मनपाने कांचनवाडी ते ज्युबिली पार्कपर्यंत ८०० मि़मी़ व्यासाच्या जलवाहिनीचे काम सुरू केले़ ते काम हायड्रोक्लोरिक डिझाईन न करता पूर्ण केले आहे़ मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे ती जलवाहिनी वॉटर हॅमरिंगने (वेगाने पाणी आदळणे) वारंवार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.जलवाहिनीला वरद गणेश मंदिराजवळ मोठा बेंड लावण्यात आला आहे़ तेथे पूर्वीची ७०० मि़मी़ची जलवाहिनी गेलेली आहे़ त्याच जलवाहिनीच्या बॅरिगेट्सवर नवीन जलवाहिनी ‘रेस्ट’ करण्यात आली आहे़ त्या ठिकाणी ‘भूमितीचे’ सर्व निकष डावलून काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कांचनवाडी ते ज्युबिलीपार्कपर्यंत ७५० मि.मी़ व्यासाची जलवाहिनी असताना ४० कोटी रुपयांची जलवाहिनी सुजल निर्मलमधून फक्त आणि फक्त समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसाठी गिफ्ट म्हणून टाकण्यात आली. १२ वॉर्डांना त्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार आहे. कंपनीने अजून इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काहीही काम सुरू केले नाही.शासनाने देऊ केलेली एवढी मोठी रक्कम एकाच जलवाहिनीवर खर्ची घालण्याचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले़ विशेष म्हणजे ती रक्कम समांतर जलवाहिनीच्या करारातून वगळली नाही़ दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर उपअभियंत्यांनी सांगितले की, त्या जलवाहिनीचे काम तांत्रिकदृष्ट्या ८०० ते ५०० मी़मी़च्या आकारात झाले आहे. समांतरच्या करारात या रकमेचा समावेश नाही. दीड वर्षापूर्वीच जलवाहिनीचे काम झाले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने तिचे तोंड उघडले नाही. त्यामुळे विद्यापीठ व नंदनवन कॉलनी परिसरात उच्च दाबाने कधीही पाणीपुरवठा झाला नाही. समांतरसाठी त्या जलवाहिनीचे तोंड बंदच ठेवले. योजना हस्तांतरित झाल्यानंतर जलवाहिनीचे तोंड उघडले? या बदमाशगिरीमुळे नागरिकांना दीड वर्ष पाण्यासाठी भटकावे लागले.मुंबईच्या एसएमसी या कंत्राटदार संस्थेने योजनेचे काम केले आहे़ कंत्राटदाराने डिझाईन देणे गरजेचे होते़ मात्र, तसे न झाल्यामुळे वरद गणेश मंदिराजवळ ती जलवाहिनी अतिशय कमी जागेतून टाकण्यात आली. भूसंपादनाची कुठेही गरज भासू नये यासाठी तो खटाटेप केला. अंतर्गत खोदकाम करून ती जलवाहिनी टाकल्यामुळे तिच्यात घाण साचली.