हॉटेल लोकसेवा येथे मित्रांसह जेवायला गेलेल्या विकास भारत रोकडे यांची मोटारसायकल (एमएच २० सीके २५७२) चोरट्यांनी २७ डिसेंबरच्या रात्री पळविली. रोकडे यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी प्रोझोन मॉलसमोरील रस्त्यावर उभी मोटारसायकल (एमएच २० डीएच ७४३१) लंपास केली. याविषयी बबलू अलमनूर पठाण (रा. नारेगाव) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. तिसऱ्या घटनेत ज्योतीनगरमधील जीवनमित्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी मोटारसायकल २६ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी पळविली. याप्रकरणी राजेश गुलाबराव हुंबाड यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. चौथ्या घटनेत स्वप्नील सुधाकर मोहळ यांची मोटारसायकल रेल्वेस्टेशन रोडवरील लाभ चेंबरसमोरून चोरी झाली. २५ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या घटनेविषयी त्यांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.
विविध ठिकाणांहून ४ दुचाकी पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST