शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

बजाजनगरात ४ दुचाकी जाळल्या

By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू असून, दोन दिवसांनंतर या टोळीने चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना काल रात्री बजाजनगरात घडली.

वाळूज महानगर : बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू असून, दोन दिवसांनंतर या टोळीने चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना काल रात्री बजाजनगरात घडली. या टोळीने आणखी दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे फसला.बजाजनगरात दोन दिवसांपूर्वीच दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच काल १९ डिसेंबरला रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू टोळीने बजाजनगरातील रुक्सन हाऊसिंग सोसायटीतील तीन दुचाकींना आग लावली. या दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज आल्यामुळे प्रवीण देसले घराबाहेर आले असता त्यांना घरासमोर दुचाकी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्यामुळे उषा देसले, मनीषा पाटील, नीलेश देसले, किशोर ब्रह्माणजाई, विकास बहुरे, बबनराव चौरे, सुहास पाटील, गणेश डोरके, राहुल पाटील यांनी घराबाहेर येऊन पेटलेल्या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत राहुल रमेश पाटील यांची एमएच-२०, सीडब्ल्यू-३२३९, गणेश माणिकराव डोरके यांची एचएच-२०, बीएम-९१६७ व सुहास भास्कर पाटील यांची एमएच-२०, सीडी-३२८५ आणि फतरूशहा भिकनशहा यांची एमएच-२0 डीसी-२८२४ या चार दुचाकी भस्मसात झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रवीण पाटील, सहायक फौजदार एस.बी. सानप, पोहेकॉ. एस.वाय. गायकवाड, पोहेकॉ. अर्जुनराव गावंडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीकेली. या प्रकरणी राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार सानप करीत आहेत.दोन दुचाकी बचावल्याया सोसायटीत एकाच रांगेत उभ्या असलेल्या चार दुचाकी माथेफिरूने पेटवून दिल्या होत्या. लगतच उभ्या केलेल्या एका स्कूटीवर व एका दुचाकीवर पेट्रोल ओतण्यात आले होते. मात्र, दुचाकी जळत असताना नागरिक विझविण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे या दुचाकींना आग न लावताच माथेफिरू पकडल्या जाण्याच्या भीतीने पसार झाले. प्रसंगावधान राखून प्रवीण देसले या युवकाने या दुचाकी बाहेर काढल्यामुळे त्या आगीपासून बचावल्या आहेत.अज्ञात माथेफिरू टोळीने बजाजनगर व परिसरात आतापर्यंत जवळपास २० ते २५ चारचाकी वाहने, तर १०० च्या आसपास दुचाकी पेटवून दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी १७ डिसेंबरला मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील स्वेदशिल्प हौसिंग सोसायटीतील प्रदीप शिवप्रसाद तिवारी यांची पल्सर (क्रमांक एमएच-२० सीजे ९२०७) ही दुचाकी अज्ञात माथेफिरूने पेटवून दिली होती. दुचाकी जळत असताना मोठ्या स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे रूपाली फलटणे या गृहिणीने आरडाओरडा केल्यामुळे गोकुळ परदेशी यांची लोडिंग रिक्षा (क्रमांक एमएच-२० सीटी-२१०) ही बचावली होती.