शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

३९४ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST

मानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ११ कलमी कार्यक्रम हाती घेतला. या अंतर्गत व्हॅर्मी कंपोस्टींग आणि नाडेफ कंपोस्टींगसाठी ३९४ प्रस्ताव मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाखल केले. मात्र अजूनही या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात कुशल रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच शाश्वत संसाधनाची निर्मिती करणे, या कारणामुळे ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे, सिंचन विहीर, शेततळे, फळबाग, गांडूळ खत, नाडेप खत, शोषखड्डे, रोपवाटिका, वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश करुन राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना २०१६-१७ पासून प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतस्तरावर आणि यंत्रणा स्तरावर कामाचे नियोजन विभागीय आयुक्तांनी ठरवून दिले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली छाननी समिती रद्द केली. मानवत तालुक्यात कृषी विभागामार्फत फळबाग, गांडूळखत, नाडेप प्रकल्पासाठी १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत लाभार्थ्याची निवड करुन हे प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्यात आले. गांडूळ आणि नाडेपसाठी तब्बल ८०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले. तर फळबाग लागवडीसाठी ५०० प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र कृषी विभागाला मनरेगाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत स्वारस्य नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ११ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष कार्यक्रम मार्च महिन्यात राबविला. असे असले तरी कृषी विभागाकडून मात्र सार्वजनिक कामे करण्यात आली नाहीत. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या कामांनाही मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत.