शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

३५० हेक्टरवरील तुरीला फुलेच!

By admin | Updated: December 31, 2016 23:37 IST

औसा तुरीच्या आयसीपीएच २७४० या नव्या वाणाची लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते, असे सांगून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाणाचे तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़

रमेश शिंदे औसातुरीच्या आयसीपीएच २७४० या नव्या वाणाची लागवड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते, असे सांगून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाणाचे तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़ हे पीक आता काढणीला आले असून केवळ फुलेच लगडली आहेत़ शेंगाचे प्रमाण मात्र फारच अत्यल्प आहे़ त्यामुळे ३५० हेक्टरवर तुरीचा खराटाच दिसत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़तालुक्यात खरीपाचे पेरणीयोग्य क्षेत्र ९५ हजार हेक्टर क्षेत्र असून तुरीचे क्षेत्र २७ हजार २१६ हेक्टर आहे़ यंदा चांगला पाऊस झाल्याने चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती़ दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुरीचे चांगले उत्पन्न देणारे आयसीपीएच २७४० हे वाण विकसित झाल्याचे सांगून त्याचे शेतकऱ्यांना मोफत वाटप केले़ ६०० शेतकऱ्यांनी हे तुरीचे वाण घेऊन पेरा केला़ त्यातील काही शेतकऱ्यांनी गादी वापे तयार करुन लागवड केली़ त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या तुरीचे क्षेत्र ३५० हेक्टर आहे़ या नव्या वाणाच्या तुरीच्या रोपांची शेतकऱ्यांनी चांगली जोपासना केली़ काहींनी तर ठिबक सिंचनचा वापर केला़ हे पीक बहरल्याने शेतकरी आनंदी झाले आणि यंदा चांगले उत्पन्न मिळणार अशी आशा बाळगून होते़ परंतु, ही तूर लागवड करुन सहा महिने उलटले असून तूर पीक काढणीस आले आहे़ मात्र, या वाणाच्या तुरीच्या पिकांस केवळ फुलेच लागली आहेत़ या फुलांची गळतीही मोठ्या प्रमाणात होऊन अत्यल्प प्रमाणात शेंगा लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ या वाणाचा तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे़नागरसोगा, बोरफळ, लिंबाळा (दाऊ), बानेगाव, भादा यासह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी तुरीचे आयसीपीएच २७४० हे वाण बोगस आहे़ सहा महिने उलटले तरी शेंगा लागत नाहीत़ या पिकासाठी आतापर्यंत खुरपणी, फवारणीसाठी एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च झाला आहे़