शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षांनंतर ‘बबऱ्या’ जाळ््यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:51 IST

लातूर : तब्बल ३५ वर्षापूर्वी आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यात आपल्याला अटक होईल, हे ध्यानीमनी नसलेल्या बबऱ्या भोसलेच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री आवळल्या

लातूर : तब्बल ३५ वर्षापूर्वी आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यात आपल्याला अटक होईल, हे ध्यानीमनी नसलेल्या बबऱ्या भोसलेच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री आवळल्यानंतर गुन्ह्यांच्या घटनांचा पटच डोळ््यासमोर उभा राहिला. पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला तब्बल ३५ वर्षानंतरही पोलीस जेरबंद करते, हेच यातून पुढे आले आहे. एका गुन्हेगार सहकाऱ्याने दिलेल्या माहितीने बबऱ्याला पोलिसांच्या जाळ््यात अलगद ओढले आणि बबऱ्याच्या गुन्हेगारी विश्वाचा उलगडा झाला. चाकूर तालुक्यातील कारेवाडी येथील मुळचा असलेला बबऱ्या शितोळ््या भोसले हा १९८१ साली रेणापूर येथील झोपडपट्टीतील घराला आग लावल्याप्रकरणी रेणापूर पोलिसांना हवा होता. मात्र, गेल्या ३५ वर्षापसून तो पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून फरार होता. आता बबऱ्याचे सध्याचे वय हे ५८ आहे. तारुण्यात केलेल्या गुन्ह्यात आयुष्याच्या सांयकाळी पोलीस अटक करतील यावर बबऱ्याचाही विश्वास बसत नव्हता. मात्र, एका गुन्हेगाराच्या माहितीवरुन बबऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे पुढे आले आणि पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर बबऱ्याचा ठावठिकाणा लागला...वेताळ झोपडपट्टी घाटशिळ, तुळजापूर असा त्याचा पत्ता पोलिसांच्या हाती आला. एकंदरित त्याची पूर्ण माहिती मिळविल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या अटकेची तयारी केली. वार गुरुवार, रात्रीची २.३० वाजताची वेळ...लातूरहून पोलिसांचे वाहन तुळजापूरच्या दिशेने सुसाट निघाले. दरम्यान, काही दिवसापूर्वी बबऱ्या ज्या झोपडपट्टीत राहत होता त्या परिसराची पाहणीही पोलिसांनी केली होती. मध्यरात्री अचानक घाटशिळच्या वेताळ झोपडपट्टीत पोलिसांचे वाहन घुसले आणि बबऱ्या भोसलेच्या घराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेढा घातला. बबऱ्या भोसले झोपेत होता. घरात पत्नी आणि बबऱ्या हे दोघेच होते. दारावर पोलिसांची थाप पडताच बबऱ्या झोपेतून उठला आणि दार काढतानाच त्याच्या मनात पाल चुकचुकली...कोण आहे? असे म्हणताच बाहेरुन पोलिसी आवाज त्याच्या कानावर पडला अन् त्याला घामच फुटला. मात्र, पळून कसे जाणार...तारुण्यातील ती मस्ती आता वयाच्या ५८ व्यावर्षी त्याच्या अंगात उरली नव्हती. दार काढल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अन् पत्नीच्या चेहऱ्यावर चिंता वाढली.