शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

३४ जागी बोगस मतदान

By admin | Updated: October 21, 2014 01:14 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत.

सुनील कच्छवे , औरंगाबादविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत तब्बल ३४ ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत हे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांत खऱ्या मतदारांना नंतर कागदी (प्रदत्त) मतपत्रिका देऊन मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत बोगस प्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदारांना सोबत ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले होते; पण तरीही काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दुपारनंतर मतदानासाठी गेलेल्या काही मतदारांना कुणी तरी आधीच त्यांच्या नावावर मतदान केल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदारांकडे त्यांचे ओळखीचे पुरावे तपासून खातरजमा केली. तेव्हा खरोखरच दुसरेच कुणीतरी त्यांच्या नावावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मग मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांच्याकडील कागदी मतपत्रिका देऊन त्यावर संबंधित मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक १४ ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही १३ ठिकाणी प्रदत्त मतपत्रिकेचा वापर करावा लागला. शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये मात्र असा एकही प्रकार उघडकीस आला नाही. सिल्लोड २, फुलंब्री ३ आणि गंगापूर मतदारसंघात २ ठिकाणी असे प्रकार समोर आले. 1मतदान केंद्रांवर गेल्यावर एखाद्या मतदाराला त्याचे मतदान आधीच नोंदविले गेल्याचे आढळते. ते मतदान त्याच्याऐवजी कुणीतरी दुसऱ्यानेच केलेले असते. अशा प्रकरणात आधी खातरजमा केली जाते. खरोखरच तसे घडले असेल तर मग खऱ्या मतदाराला मतदान करू दिले जाते. 2मात्र, हे मतदान ईव्हीएमवर करणे शक्य नसते. त्यामुळे त्यासाठी आयोगाच्या सूचनांनुसार केंद्राध्यक्षांकडे काही कागदी मतपत्रिका दिलेल्या असतात. त्याला प्रदत्त मतपत्रिका म्हणतात. त्यावर मतदान करून घेतले जाते. 3मात्र, हे मतदान मोजणीच्या वेळी विचारात घेतले जात नाही, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.