शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १०० तपासण्यांमध्ये ३२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० नागरिकांच्या केलेल्या तपासणीत तब्बल ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने पसरतो आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, रिकव्हरी रेट अर्थातच कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत खालावल्याने चिंता वाढली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला. दिनांक १ मार्चपासून कोरोना रूग्णांमध्ये सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात दररोज २० ते २५ कोरोना रूग्ण आढळून येत होते. मात्र, मागील तीन आठवड्यांत जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण सापडत असल्याने केंद्र व राज्य सरकारनेही औरंगाबादेतील वाढत्या रूग्णसंख्येवर चिंता व्यक्‍त केली आहे. शनिवारी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल १,६७९ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील १,२१७ कोरोनाचे नवीन रूग्ण होते. महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहराचा शनिवारच्या कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट तब्बल ३२ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. म्हणजेच १०० कोरोना चाचण्यांमागे ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट ठरला असून, आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्‍त केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १० हजार ४५८ सक्रिय रूग्ण असून, यापैकी ८ हजार १४० रूग्ण शहरातील आहेत, हे विशेष. त्यांना उपचार सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा संसर्ग याच गतीने वाढत राहिल्यास शहरातील परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

मृत्यूदर वाढल्याने रिकव्हरी रेट घटला

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बाधित रूग्णांमधील मृतांमध्येही वाढ होत आहे. मागील तीनच दिवसात जिल्ह्यात ४० बाधितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मृतांचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेटदेखील कमी झाला आहे. यापूर्वी शंभर टक्क्यांवर असलेला शहराचा रिकव्हरी रेट हा शनिवारी ८०.२६१ टक्के एवढा नोंदवला गेला.

तब्बल अडीच हजार रूग्ण घरीच

शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी खाटांच्या कमतरतेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या घरीच गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत तब्बल २ हजार ६१७ रूग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.