शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

३० खांबावरील विद्युत तार लंपास

By admin | Updated: October 18, 2016 00:15 IST

वाशी : शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ३० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या़

वाशी : शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ३० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना शनिवारी रात्री काळेवाडी रोडलगत घडली़ दरम्यान, मागील चार-पाच महिन्यात जवळपास १८० विद्युत खांबावरील तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़तालुक्यातील केळेवाडी मार्गालगत शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी किसनराव कवडे यांच्या शेतातील डीपीवरील ३० विद्युत खांबावरील तारा लंपास केल्या आहेत़ यापूर्वी मागील आठवड्यात टेंभीजवळील वीज वाहिनेची ४० खांबावरील तारांची चोरी झाली होती़ दोन दिवसापूर्वीच सारोळा मांडवा शिवारातील १५ खांबावरील विजेच्या तारांची झाल्याची माहिती वीज कंपनीचे अभियंता भुरेवार यांनी दिली. शेतीपंपासाठी असणाऱ्या वीजकंपनीच्या खांबावरील तारांच्या चोरीत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ तारा चोरीस आळा घालण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यासह शेतकऱ्यांनीच आता पावले उचलणे गरजेचे आहे़ तसेच ज्या वीज कंपनीच्या वाहिन्यावरील तारेची चोरी झाली आहे़ त्याचा शोध मात्र, अद्यापही पोलिसांना लागलेला नाही़ दोन ते तीन गुन्ह्यातील चोरीची तार पकडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव महानोर यांनी दिली. मात्र, चोरीस गेलेल्या तारेमध्ये व पोलिसांनी जप्त केलेल्या तारेमध्ये मोठी तफावत दिसून येते. तारेची चोरी उघड केल्याचा दावा जरी पोलिसांकडून करण्यात आला असला तरी ज्या प्रमाणात चोरी झाली आहे़ त्या प्रमाणात तारांची जप्ती झालेली नाही़ (वार्ताहर)