शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटामुळे भिंत पडून पती-पत्नीसह तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:23 IST

मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक कशाचा तरी स्फोट होऊन पतीपत्नीसह अन्य एक महिला असे तीन जण ठार झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील एका घरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक कशाचा तरी स्फोट होऊन पतीपत्नीसह अन्य एक महिला असे तीन जण ठार झाले. स्फोटाच्या आवाजाने घटनास्थळ हादरले. मैत्रीण महिला आणि पती- पत्नी यांनी संपत्तीच्या वादातून जाळून घेतले आणि त्याच वेळी घराची भिंत पडल्याचा दावा या घटनेसंदर्भात मुकुंदवाडी पोलिसांनी केला.शारदा भावले (५०, रा. राजीव गांधीनगर), सूर्यभान कचरू दहीहंडे (५५) आणि सुमन दहीहंडे (५०,दोघेही रा. बजाजनगर) अशी मयतांची नावे आहेत.पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी सांगितले की, सूर्यभान आणि सुमन हे बजाजनगरमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शारदासोबत सूर्यभान यांचे मैत्रीचे संबंध होते.शारदा यांना घर खरेदी करण्यासाठी सूर्यभानने पैसे दिले होते. शुक्रवार दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास दहीहंडे पती-पत्नी राजीव गांधीनगरातील शारदाच्या घरी गेले. घर नावे करून देण्याच्या मागणीवरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी स्वयंपाकाच्या खोलीत अचानक कशाचा तरी स्फोट झाला. या घटनेत त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि तिघेही गंभीररीत्या जळाले. या घटनेत शारदा घटनास्थळीच ठार झाली तर दहीहंडे पती-पत्नी गंभीर जळाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत शारदा, जखमी सुमन आणि सूर्यभान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे सूर्यभान यांचा आणि त्यांची सुमन यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी दिली.जबाब नोंदविता आला नाहीघटनेनंतर गंभीर जखमी पती-पत्नींचा जबाब शुक्रवारी पोलिसांना घेता आला नाही.नंतर उपचारदरम्यान पती पत्नीचा मृत्यू झाल्याने जबाब नोंद करण्यात आले नाही यामुळे घरामध्ये तिघांमध्ये नेमके काय घडले, याबाबत अचूक माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते हे करीत आहेत....अन् शवविच्छेदन पंचनामा केला एमआयडीसी वाळूज पोलिसांनीस्फोटात गंभीररीत्या भाजल्यानंतर दहीहंडे पती- पत्नी रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अपघात विभागातील डॉक्टरांना सांगितलेल्या नाव आणि पत्त्याच्या आधारे घाटी पोलीस चौकीच्या पोलिसांनी ही घटना बजाजनगर येथे घडल्याचे समजून या घटनेची एमएलसी एमआयडीसी वाळूज पोलिसांना पाठविली आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनीही घटनास्थळाची शहानिशा न करता मृत सूर्यभान दहीहंडे आणि सुमन दहीहंडे यांचे शवविच्छेदनपूर्व पंचनामा केला. घाटीत दोन्ही शवांचे विच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे एपीआय साईनाथ गीते यांना विचारले असता ही तांत्रिक चूक असल्याचे ते म्हणाले.