शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

२९ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: September 4, 2014 01:24 IST

परंडा : परंडा पोलीस ठाणे हद्दीत २९ ठिकाणी एक गाव एक गणपती, संकल्पना राबविण्यात आली आहे. शहरात परवानाधारक १६ तर विनापरवानाधारक ३ असे

परंडा : परंडा पोलीस ठाणे हद्दीत २९ ठिकाणी एक गाव एक गणपती, संकल्पना राबविण्यात आली आहे. शहरात परवानाधारक १६ तर विनापरवानाधारक ३ असे एकूण १९ तर ग्रामीण भागात ६० परवानाधारक तर विनापरवानाधारक १५ असे एकूण ७५ गणेश मंडळांनी श्रीची प्रतिष्ठापणा केली आहे. एक गाव एक गणपती संकल्पनेअंतर्गत सिरसाव, आरणगाव, लाखी, चव्हाणवाडी, कुंभेजा, आष्टा, पिठापुरी, खासापुरी, खासापुरी २, नालगाव, येणेगाव, टाकळी, कुंभेफळ, भोत्रा, आंधोरा, वांगी (खु.), पाचपिंपळा, देवांग्रा, ढगपिंपरी,जामगाव,साकत, जाकेपिंपरी, वागेगव्हाण, भोंजा, पिंपळवाडी, रोसा, देवगाव, घारगाव आदी गावामध्ये श्रीची प्रतिष्ठापणा झाली आहे. तर शहरात शिवाजीनगर गणेश मंडळ शिवाजीनगर, हंसराज गणेश मंडळ महात्मा फुले चौक, छत्रपती राजे तरुण गणेश मंडळ सोमवार गल्ली, शिवछत्रपती गणेश मंडळ आझाद चौक, जयभवानी गणेश मंडळ जयभवानी चौक, नवजीवन गणेश मंडळ मंडईपेठ, यशवंत गणेश मंडळ धनगर गल्ली, बालवीर गणेश मंडळ राजपुरा गल्ली, साईनाथ गणेश मंडळ चेतक रोड, मोरया तरुण गणेश मंडळ समर्थनगर, छत्रपती तरुण गणेश मंडळ काशीमबाग, विठ्ठल गणेश मंडळ कुऱ्हाड गल्ली, जय हनुमान टेंबे गणेश मंडळ पाटील गल्ली, नरवीर तरुण गणेश मंडळ मंगळवार पेठ, जय मल्हार गणेश मंडळ खंडोबा चौक, समर्थनगर तरुण गणेश मंडळ मंगळवार पेठ आदी ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, विविध मंडळांच्या वतीने समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. (वार्ताहर) कळंब : शहरातील व्यंकटेश गणेश मंडळ दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान विविध उपक्रम राबवित असून, यंदा मंडळ व रोटरी क्लबच्या वतीने मृदु मूर्तीकला व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी विठ्ठल मंदिर, बुरुड गल्ली येथे खुला गटासाठी जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम व आदिवासी जीवनशैली आठवी ते दहावी गटासाठी वारली चित्रशैली व ग्रामीण जीवनशैली, पाचवी ते सातवी गटासाठी शाळेतील प्रसंग व पर्यावरण संवर्धन तर पहिली ते चौथी गटासाठी निसर्गचित्र व गणेशोत्सव या विषयावर चित्रकला स्पर्धा तर खुला गटासाठी ऐतिहासिक वस्तू व व्यक्तिशिल्प, आठवी ते दहावी गटासाठी बलुतेदार व वाहतूक साधन, पाचवी ते सातवी गटासाठी गणेशमूर्ती व फुलदाणी, पहिली ते चौथी गटासाठी गृहोपयोगी साहित्य व फळे या विषयावर मृदु मूर्तीकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चित्रकलेसाठी व मृदू मूर्तीकला स्पर्धेसाठी दिवसभर पाऊस असतानाही शहरातील ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील कलाकृतीचे ६ व ७ रोजी मंडळासमोरील मैदानात प्रदर्शन भरविण्यात येणार असून, ८ रोजी निकाल व पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय मालपाणी, शिवाजी पचमारे, सुरेश इंगळे, परमेश्वर मोरे, शरद आडसूळ, रोटरीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, सचिव ब्रिजलाल भुतडा, प्रकल्प अध्यक्ष प्रा. किशोर मोरे, प्रा. सनजय घुले यांनी परिश्रम घेतले. कळंब : येथील आदर्श युवा गणेश मंडळातर्फे दरवर्षी विविध नाविण्यपूर्ण स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही मंडळाने ही परंपरा कायम जपली असून, गावातील तरुणांमध्ये व्यायामाचे महत्व वाढावे यासाठी सोमवारी खुल्या दंड बैठक स्पर्धा घेण्यात आल्या. तीन गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धांना गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हनुमान तालीम संघाच्या सदस्यानी या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून आपली छाप उमटविली. यात लहान गटात विजय धोंडीराम ठोंबरे याने तब्बल १००९ दंड बैठका मारुन प्रथम क्रमांक मिळविला. याच गटातून अभय गोविंद खडबडे याने ४७० दंड बैठका मारत दुसरा क्रमांक पटकाविला. मोठ्या गटातून अमोल अशोक पाटील याने ५६४ दंड बैठका मारुन प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालीम संघाचे मार्गदर्शक भालचंद्र गुरव, जयराज परदेशी, गणेश म्हेत्रे, नाना खडबडे, अक्षय पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी शहाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. साजेद चाऊस, राजेंद्र मुंदडा आदींची उपस्थिती होती.