शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२८ ‘वाँटेड’ गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By admin | Updated: September 30, 2014 01:31 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादा आणि अनेक वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशनअंतर्गत २८ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात वाँटेड असलेले, तसेच अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिले. गुन्हे शाखेच्या विविध पथकांच्या संयुक्त कारवाईत २८ जणांना अटक करण्यात आली. सिडको पोलीस ठाण्यात १९९५ साली गणपत धनसिंग राठोड (रा.हर्सूल)याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्यास अटक करण्यात आली.क्रांतीचौक ठाण्यांतर्गत २००६ मध्ये शेख अहमद शेख रहेमान (रा.संजयनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेबूब खान जानी खान ऊर्फ इसाक खान (रा. आशूरखाना, उस्मानपुरा) हा सहा वर्षांपासून फरार होता. आसेफ अजीज कुरेशी, इमरान अजीज कुरेशी, अजमत अजीज कुरेशी (सर्व रा. सिल्लेखाना) हे ५ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होते. त्यांना अटक करण्यात आली. राजू गजानन काळे (रा. ऐश्वर्या अपार्टमेंट) हा ५ वर्षांपासून फरार होता. आंबेडकरनगर येथील लक्ष्मण शंकर मकळे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात वाँटेड होता. त्यास अटक करण्यात आली.राहुल गौतम गाडे (२२, रा.शाहूनगर, परभणी) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. योगेश धनसिंग हरणे (रा. गोकुळनगर, जाधववाडी), गणेश सदाशिव बंगाळे (घाटी परिसर), माणिकराव रामराव शिंदे (एन-७, सिडको), हनुमंत माणिकराव कदम (शिवाजीनगर), राजू कचरू जाधव (मिटमिटा), किरण प्रक ाश सनान्से, (साईनगर), इस्माईल बक्ष करीम बक्ष, सय्यद ख्वाजा सय्यद महेमूद, सय्यद फेरोज सय्यद मुक्तार (रा. पैठणगेट, भाजीमंडी) हे दोन वर्षांपासून वाँटेड होते. त्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. प्रवीण रमेश जमधडे, विशाल विजय केदारे (रा. वडगाव कोल्हाटी), नितीन अर्जुन सोनवणे (रांजणगाव शे.), आसेफ अजीज कुरेशी, इमरान अजीज कु रेशी, अजमत अजीज कुरेशी (सिल्लेखाना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.